‘मलिक-देशमुखांनी सुडाच्या राजकारणाविरोधी लढत देशातील युवकांपुढे वेगळा आदर्श घालून दिला आहे’

बीड – जेव्हा देशात दिल्लीश्वरांचे राज्य होते तेव्हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी खऱ्या अर्थाने मराठी भूमीला स्वाभिमानाची जाणीव करून दिली. त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांनीही आपल्या पित्याच्या स्वाभिमानाची परंपरा पुढे चालवली. महाराष्ट्र दिल्ली समोर कधीच झुकला नाही असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी बीडमध्ये राष्ट्रवादीच्या स्वाभिमान सभेत बोलताना म्हणाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची काल अजित पवार (Ajit Pawar) गटाते नेते आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या बालेकिल्ला असलेल्या बीडमध्ये सभा पार पडली. या सभेला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार फौजिया खान, आमदार रोहित पवार, आमदार अनिल देशमुख, आमदार राजेश टोपे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, सुनील भुसारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे, आमदार संदीप क्षीरसागर हे नेते उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की महाराष्ट्रातील समाजसुधारकांनी सुडाचे राजकारण नाही तर प्रेमाचे राजकारण केले. यामुळे आजही ते जनमानसात जिवंत आहेत; पण आज अनेकजण राजकीय स्वार्थापोटी सुडाचे राजकारण करत समाजात वेगळा पायंडा पाडण्याचा प्रयत्न करत आहेत असा आराेपही त्‍यांनी केला.

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) तुरूगांत गेले. त्‍यांनी सुडाच्या राजकारणाविरोधी लढत देशातील युवकांपुढे वेगळा आदर्श घालून दिला आहे असेही जयंत पाटील यांनी म्हटले. धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये शरद पवार यांच्या स्वागतासाठी पोस्टर्स लावले. त्यांना आजही शरद पवारांच्या आशिर्वादाची गरज असल्याचे ऐकूण बरे वाटले असेही यावेळी बोलताना म्हटले.