अरे संदीप… वंजारी समाजाचा पोरगा तुला शब्द देतो की,…; जितेंद्र आव्हाडांचा एल्गार

कभी कभी सैलाब आता है और सबकुछ बदल देता है तसाच आताही सैलाब आला आणि आमचा संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) नेता झाला. नाहीतर तो तरी कधी नेता म्हणून पुढे आला असता. चांगल्या चांगल्यांना आपण आजपर्यंत छातीवर घेतले आहे. आले अंगावर घेतले शिंगावर हा शरद पवारांचा नियम आहे. आणि आपण सर्व त्यांचे चेले आहोत असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद तथा नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी म्हणत विरोधकांना थेट आव्हान दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची काल अजित पवार (Ajit Pawar) गटाते नेते आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या बालेकिल्ला असलेल्या बीडमध्ये सभा पार पडली. या सभेला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार फौजिया खान, आमदार रोहित पवार, आमदार अनिल देशमुख, आमदार राजेश टोपे, आमदार संदीप क्षीरसागर, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, सुनील भुसारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे, आमदार संदीप क्षीरसागर हे नेते उपस्थित होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले, डरेंगे नाही तर लढेंगे. हा सगळा धनशक्ती विरोधात जनशक्तीचा मेळावा आहे. साहेबांचाच फोटो वापरायचा, आणि साहेबाच्याच नावाने दिशाभूल करायची.आता तुम्ही नाद केला आहे. अऱे संदीप तुझी आजी आज आकाशातून , प्रेमाने आनंदाने बघत असेल. कारण मला तुझ्याकडून बघून ही अपेक्षा नव्हती. पण तो ज्यावेळी खात्रीने सांगायचा की, साहेब, तुम्ही येऊन बघा, काय करतोय ते एकदा येऊन बघा. पण हा भगवानबाबाचा, वंजारीसमाजाचा पोरगा तुला शब्द देतो की, बीडच्या लढाईत तु्झ्या खांदाला खांदा लावून लढेन. बबन गिते, शंकर बांगर आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहेत. हा बीड जिल्हा आपण पुन्हा हलवून टाकू हा साहेबांना शब्द देतो. साहेबांना डिस्टर्ब करण्यासाठी, त्यांची राष्ट्रीय प्रतिमा मलीन करण्यासाठी केले जात आहे असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सभेपूर्वी शरद पवार बीडमध्ये दाखल झाले तेव्हा जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. तसंच शरद पवार हे जेव्हा स्टेजवर आले तेव्हा देश का नेता कैसा हो? शरद पवार जैसा हो. महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार या घोषणा देण्यात आल्या. बीडमधल्या ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने शरद पवार साहेब यांचा सत्कार करण्यात आला.