Mamata Banerjee | ममता बॅनर्जींच्या डोक्याला तीन टाके, ईसीजी-सीटी स्कॅननंतर रुग्णालयातून डिस्चार्ज

Mamata Banerjee Head Injury | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डोक्याला दुखापत झाल्यामुळे त्या सध्या निरीक्षणात आहे. राज्य सरकार संचालित एसएसकेएम रुग्णालयाचे संचालक डॉ.मणिमॉय बंदोपाध्याय यांनी ही माहिती दिली. घरी पडल्याने मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी काही टाके घालून उपचार केले.

रुग्णालयाचे संचालक डॉ. मनिमॉय बंदोपाध्याय यांनी गुरुवारी (14 मार्च) रात्री प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना दुखापतीवर उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांना मागून ढकलण्यात आले, त्यामुळे त्या घरात पडल्या. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाच्या संचालकांनी सांगितले की, डॉक्टरांनी त्यांच्या कपाळावर तीन टाके घातले आणि एक टाका नाकाला घातला, जिथून रक्त वाहत होते.

दुखापतीतून खूप रक्तस्त्राव होत होता
डॉ. मनिमॉय बंदोपाध्याय म्हणाले, ‘आम्हाला संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मुख्यमंत्र्यांची माहिती मिळाली की, मागून ढकलल्यामुळे त्या घरात पडल्या आहेत. त्यांच्या डोक्याला जखम झाली असून कपाळ व नाक कापले गेले होते, त्यामुळे खूप रक्तस्त्राव झाला होता. ते म्हणाले, ‘रुग्णालयातील एचओडी न्यूरोसर्जरी, एचओडी मेडिसिन आणि कार्डिओलॉजिस्ट यांनी त्यांची तपासणी केली. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांची प्रकृती स्थिर करावी लागली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

मुख्यमंत्री राहतील देखरेखीखाली
रुग्णालयाचे संचालक म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांच्या कपाळावर तीन टाके घालण्यात आले आणि त्यांच्या नाकाला एक टाका घालण्यात आला आणि आवश्यक ड्रेसिंग करण्यात आले. ईसीजी, सीटी स्कॅनसारख्या आवश्यक चाचण्याही करण्यात आल्या आहेत. याबाबत डॉक्टरांनीही आपले मत मांडले आहे. ते पुढे म्हणाले, ‘त्यांना रुग्णालयात निरीक्षणाखाली राहण्याचा सल्ला देण्यात आला होता, परंतु त्यांना घरीच राहणे चांगले वाटले. मुख्यमंत्र्यांचे निरीक्षण सुरू राहणार असून डॉक्टरांच्या टीमच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू राहणार आहेत. उद्या त्यांची पुन्हा तपासणी करण्यात येणार असून त्यानुसार पुढील उपचाराचा निर्णय घेतला जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

पुण्यात मुरलीधर अण्णांचाच विजय पक्का? ‘हे’ फॅक्टर्स मिळवून देणार त्यांना महाविजय?

Sharad Pawar | मोदी साहेब माझ्या बोटाला हात लावू नका, शरद पवारांचा पंतप्रधानांना इशारा

Amol Kolhe | जे सरकार शिवाजी महाराजांच्या पहिल्या राजधानीच्या नावाने नामकरण करतं, ते सरकार त्यांचे आदर्श पाळते का?