Amol kolhe | जे सरकार शिवाजी महाराजांच्या पहिल्या राजधानीच्या नावाने नामकरण करतं, ते सरकार त्यांचे आदर्श पाळते का?

Amol kolhe | ज्यांना मतदान दिले होते, ज्यांना मतदान केले होतं, त्यांनी तुम्हाला गृहीत धरायला सुरुवात केली. ज्या माणसाकडे बघून तुम्ही मतदान केले होते, ज्या माणसाकडे बघून तुम्ही निवडून दिले होते, त्यांची साथ सोडून माणसे दुसरीकडे जायला लागली. त्यामुळे, यावेळी मतदान फक्त नाही, हा अधिकार आहे, याची जबाबदारी लक्षात ठेवा. ही जबाबदारी लोकशाही टिकवण्याची, ही जबाबदारी संविधान टिकवण्याची आहे असे खासदार अमोल कोल्हे  (Amol kolhe) नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे आयोजित महासभा एकजुटीत म्हणाले.

अमोल कोल्हे म्हणाले की, जे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या राजधानीच्या नावाने नामकरण करतं, ते सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श पाळते का ? ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला ही हात लावू देऊ नका. ही जी छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण होती. या शिकवणीनुसार आत्ताच्या एक फुल दोन डाऊट फुलच्या सरकारने एकदाही आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला नाही. असेही अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

पुढे अमोल कोल्हे म्हणाले की,संसदेत दिल्लीतून गुबूगुबू वाजल्यानंतर नंदीबैल पाठवायचे, की महाराष्ट्राच्या हितासाठी गाजणारे वाघ पाठवायचे आहेत. हे आता तुम्ही ठरवायचे आहे असेही अमोल कोल्हे म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

BJP Candidate List : भाजपची दुसरी यादी जाहीर, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, मुरलीधर मोहोळ यांच्यासह 20 जणांची नावं

Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनातील पाटी बदलली..

Rahul Gandhi | आदिवासीच देशाचे खरे मालक; जल, जंगल, जमीन हा हक्क काँग्रेस अबाधित ठेवणार