पुण्यात मुरलीधर अण्णांचाच विजय पक्का? ‘हे’ फॅक्टर्स मिळवून देणार त्यांना महाविजय?

Murlidhar Mohol: पुण्याचं कोडं कायम… गिरीष बापट यांच्या अकाली एक्झिटनंतर त्यांची पोकळी कोण भरून काढणार?… कसबा हातातून निसटल्यानंतर आता लोकसभेवर भाजप कोणत्या हुकुमी एक्क्याला पाठणार?… सुसंस्कृत पुण्याला फक्त खासदार नव्हे तर शहराच्या राजकारणावर पकड मजबूत करणारा चेहरा मिळणार का?… भाजप लोकसभेवर ब्राम्हण की ब्राम्हणेतर उमेदवार पाठवणार?…या सर्व प्रश्नांची उत्तरे आता मिळाली आहेत. भाजपाने काल लोकसभेसाठी त्यांची दुसरी यादी जाहीर केली असून पुणे लोकसभा मतदारसंघातून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

आता पुण्यात मुरलीधर मोहोळ यांचा समाना कोण करणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पुण्यात काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी, रविंद्र धंगेकर, आबा बागुल तर आता नुकताच मनसेला राम राम ठोकलेले वसंत मोरे, प्रविण गायकवाड, या नावांची चर्चा आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आता कुणाला तिकीट देणार हे पाहणे महत्वाचे ठरेल. मात्र या सर्वांमध्ये मुरलीधर मोहोळ यांची दावेदारी अधिक मजबूत दिसते आहे. ते कशामुळे? याचा लेखाजोखा आपण येथे घेणार आहोत.

पुणे लोकसभा ही काँग्रेसची तशी परंपरागत जागा. मात्र मोदी लाटेत काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का बसला. २०१४, २०१९ मध्ये सत्तेत आल्यानंतर भाजपने २०२४ मध्येही सत्तेवर येण्यासाठी यावेळी ‘अब की बार ४०० पार’ची घोषणा देत कंबर कसली आहे. भाजपचा पुणे लोकसभेतील हा दबदबा कायम ठेवण्यासाठी वरील नावांपैकी सर्वात सरस नाव मुरलीधर मोहोळ याचं दिसते आहे! त्यामागे त्यांचा मोठा राजकीय तर संघर्ष आहे. मात्र काही जमेच्या बाजू त्यांचा विजयाचा मार्ग मजबूत बनवतात.

देवेंद्र फडणवीसांशी घनिष्ठ मैत्री, सध्याचं भाजपमधील वाढतं वजन आणि पुणे शहराच्या प्रश्नांची असलेली जाण मुरलीधर मोहोळांची दावेदारी मजबूत बनवते. तीन वेळा नगरसेवक राहिलेल्या मोहोळ यांनी विविध विषय समित्या आणि स्थायी समिती अध्यक्ष, पीएमपीएलचे साडेतीन वर्षे संचालक आणि अडीच वर्षे महापौर पद भूषविले आहे. मुरलीधर मोहोळ हे अखिल भारतीय महापौर परिषदेचे उपाध्यक्षही होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

कोरोना काळातील कामामुळे घराघरात पोहोचले मोहोळ
या जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांनी विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबवले. महापौर काळातील त्यांच्या कामकाजाचा ठसा आणि कोरोना काळातील त्यांच्या कामगिरीमुळे त्यांचे नेतृत्त्व झळाळून निघाले. कोरोना काळात महापौर असताना त्यांनी पुणेकरांसाठी केलेल्या कार्यामुळे त्यांच्या प्रसिद्धीला वाव मिलाला. कोरोना काळात मुरलीधर मोहोळ स्वत: कोव्हिड पॉझिटिव्ह आढळले होते. मात्र, त्यातून बाहेर येत त्यांनी फेसबूकच्या माध्यमातून अखंडपणे जनसंवाद करत पुणेकरांना धीर दिला. कोरोनानंतर पुणे शहरात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन आपला वाढदिवस साजरा न करता ‘रक्तदान महासंकल्पा’सारखे उपक्रम ते घेत आहेत त्या माध्यमातून १८ हजार रक्त पिशव्यांचे संकलन झाले. त्याबरोबरच आरोग्य शिबिर आणि विविध सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले. त्यामुळे ‘कोरोनाला हरवणारा महापौर’ ते ‘कोरोनाग्रस्तांना आधार देणारा महापौर’ अशी प्रतिमा त्यांची जनमानसात झाली.

दांडगा जनसंपर्काला मोहोळांनी बनवली आपली ताकद
आपल्या कामाबरोबरच कार्यकर्त्यांची मोठी फौज आणि दांडगा जनसंपर्क ही मोहोळांची सर्वात मोठी ताकद आहे. लोकांमध्ये जाऊन त्यांना आपलंसं करण्यांची त्यांची वृत्ती त्यांना जनसामान्यांचा नेता बनण्यात फायदेशीर ठरते. कर्वे रस्त्यावरील वाहतुकीची समस्या सोडविण्याच्या दृष्टीने कर्वे रस्त्यावरील पहिला दुमजली उड्डाणपुल बनवला. पुणे शहराची सार्वजनिक वाहतुकीची आणि प्रदूषणाची समस्या लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून इलेक्ट्रिक बस पुणे शहरात आणल्या. याशिवाय नदी सुधार प्रकल्प, नदी पुनर्जीवन प्रकल्प, सार्वजनिक वाहतूक , २४/७ पाण्याची योजना यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि पुणे शहराच्या भविष्याचा विचार करून अनेक प्रकल्प पूर्णत्वास नेले. क्रीडाप्रेमींसाठी कोथरूडमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा, राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धा भरवल्या तसेच कीर्तन महोत्सवाचे आयोजन करून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले. लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न जाणून घेत ते सोडवण्यासाठी प्रयत्नशील असण्याच्या त्यांच्या या फॅक्टरमुळे लोकसभेच्या शर्यतीत मुरलीधर मोहोळ यांचा वरचष्मा दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या :

BJP Candidate List : भाजपची दुसरी यादी जाहीर, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, मुरलीधर मोहोळ यांच्यासह 20 जणांची नावं

Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनातील पाटी बदलली..

Rahul Gandhi | आदिवासीच देशाचे खरे मालक; जल, जंगल, जमीन हा हक्क काँग्रेस अबाधित ठेवणार