Sharad Pawar | मोदी साहेब माझ्या बोटाला हात लावू नका, शरद पवारांचा पंतप्रधानांना इशारा

Sharad Pawar | देशांमध्ये जे चालू आहे, जे काही घडत आहे हे लोकशाहीच्या देशांमध्ये घडणे हे जगाच्या हिताचे नाही, अशी एक भावना भारतात आणि भारताच्या बाहेर देखील आहे. त्यामुळेच, लोक उत्सुकतेने या निवडणुकीकडे पाहतात असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे आयोजित ‘महासभा एकजुटीची सभेत बोलताना पवार साहेब म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, निवडणुकीचा कार्यक्रम या २ – ३ दिवसात जाहीर होईल. आणि साधारणतः पुढच्या महिन्यामध्ये निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल. या निवडणुकीकडे सबंध देशाचे लक्ष आहे. देशाच्या बाहेरून अनेक पत्रकार, विचारवंत या देशाला भेट देतात. आम्हा लोकांची वेळ मागतात. आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये या देशांमध्ये काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. आणि त्याचे महत्त्वाचे कारण, देशांमध्ये जे चालू आहे, जे काही घडत आहे हे लोकशाहीच्या देशांमध्ये घडणे हे जगाच्या हिताचे नाही, अशी एक भावना भारतात आणि भारताच्या बाहेर देखील आहे. त्यामुळेच, लोक उत्सुकतेने या निवडणुकीकडे पाहतात आहे. असे शरद पवार म्हणाले.

पुढे पवार (Sharad Pawar) म्हणाले की, अनेक निवडणुका, राज्यकर्तेनी आपण पाहिल्या. जवाहरलाल नेहरूंचा काळ, लालबहादूर शास्त्रींचा काळ, इंदिरा गांधींचा काळ, राजीव गांधींचा काळ, नरसिंहरावांचा काळ, डॉ. मनमोहन सिंहांचा काळ हा या देशाने पाहिला. अटल बिहारी यांचा काळ पाहिला. वैचारिक दृष्ट्या वेगळी भूमिका होती, तरी देशाच्या हिताची जपवणूक करण्यासाठी यातील प्रत्येक व्यक्तीने प्रधानमंत्र्यांनी या देशात काळजी घेतली. आणि म्हणून ही लोकशाही टिकली. याचा अभिमान आपल्याला तर आहेच. पण, जगाला पण आहे. हल्ली गेल्या ८ – १० वर्षात नवीन राज्यकर्ते आले असे शरद पवार म्हणाले.

यावर सविस्तर बोलताना पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) काय केलं त्यांनी ? कसली धोरणे आखली ? कोणते प्रश्न सोडवले ? मला आठवतंय, मनमोहन सिंहांच्या मंत्रिमंडळामध्ये शेतीचे काम माझ्याकडे आले. राष्ट्रपती भवनात शपथ घेतली आणि घरी आलो. एक फाईल घेऊन अधिकारी भेटायला आले. त्या फाईल मध्ये लिहिले होते की, या देशांमध्ये दीड महिना पुरेल एवढे धान्य आहे. काही उपाययोजना केली नाही तर या देशांमध्ये लोकांना उपाशी राहावे लागेल. आणि त्यासाठी अमेरिकेवरून किंवा ब्राझील वरून धान्य आयात करा. मी अतिशय अस्वस्थ झालो. कृषीप्रधान देश म्हणायचा आणि धान्य बाहेरून आणायचे, नाईलाज होता. स्थिती वाईट होती. आणि म्हणून धान्य बाहेरून आणावे लागले. पण, आम्ही लोकांनी निकाल घेतला. ही स्थिती बदलायची आणि दुसऱ्या दिवशी माहिती मिळाली की, यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. काळ्या आईची इमान राखणाऱ्या शेतकरी आत्महत्या करतो. याच्या खोलात गेले पाहिजे. म्हणून मी स्वतः त्यांच्या घरी गेलो. त्यांची भेट घेतली. विचारले, काय झाले ? का आत्महत्या केली ? त्या माऊलीच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. तिने सांगितलं, मुलीचे लग्न ठरले होते. सावकाराकडून पैसे घेतले होते. त्याची परतफेड करता आली नाही. सावकाराने एक दिवशी येऊन घरातली भांडीकुंडी बाहेर काढली आणि या स्थितीमुळे मुलीचे लग्न मोडले. ते मुलीच्या बापाला सहन झाले नाही. आणि जीव दिला. हे चित्र बदलायचे होते आणि ते बदलायचे असेल, तर दिल्लीला गेल्यानंतर एका आठवड्याच्या आत निकाल घेतला की, या देशातल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायचे. ७१ हजार कोटींचे कर्ज एका मताने आम्ही माफ केले. एवढेच नाही शेतीमालाच्या किमती वाढवल्या. नवीन बी-बियाणे दिले. आणि ५ ते ७ वर्षामध्ये जो देश परदेशातून धान्य आणायचा विचार करत होता, त्या देशातल्या बळीराजांनी या देशातल्या लोकांची भुकेची गरज भागवली. एवढेच नव्हे तर, जगातल्या १८ देशांना आज धान्य पुरवायचे कामा हा देश करत आहे. या देशातल्या शेतकरी करत आहे. पण, आजचे राज्यकर्ते या धोरणाचा विचार करत नाही. असे शरद पवार यांनी सांगितले आहे.

शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, कसली गॅरंटी ? मोदीची गॅरंटी. काय गॅरंटी दिली ? आज या गॅरेंटी मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, याची गॅरंटी दिली. उत्पन्न वाढले नाही. आत्महत्या थांबल्या नाहीत. आत्महत्या वाढल्यात, त्याची गॅरंटी दिली होती. रोजगार वाढवणार, बेकारी घालवणार याची गॅरंटी दिली होती. त्यातली एकही गॅरंटी पूर्ण झाली नाही. फक्त आश्वासने देणे याशिवाय दुसरे काहीच करायचे नाही. आणि ते कोणत्याही टोकावर ते केले जाते. मला आठवतंय, एकदा मोदी साहेबांनी मला सांगितलं की, ‘शरदराव आपके बारामती में मुझे आना है ।’ मी म्हटलं, ‘आप आ सकते है।’ तुमची शेती बघायची ते बोलत होते. आले; सर्व शेती पाहिली, कारखानदारी पाहिली, शैक्षणिक संस्था पाहिल्यात. आणि पार्लमेंटमध्ये जाऊन सांगितले, शरद पवारांचा बोट धरून मी राजकारणात आलो. राजकारणात गॅरंटी द्यायची आणि पाळायची नाही आणि त्याच राजकारणात ते माझा बोट धरून आलेत. मी पार्लमेंट मध्ये सांगितलं, मोदी साहेब सगळ्या गोष्टी मान्य आहे. पण, माझ्या बोटाला हात लावू नका. माझे बोट असे राजकारण करणारे नाही. आणि गॅरंटी पाळणार नसाल, तर तुमची बदनामी असेल की, नाही याचा विचार तुम्ही करा. पण, माझ्यासारख्याची बदनामी या ठिकाणी करू नका असे पवार म्हणाले.

पवार म्हणाले की, आज अनेक गोष्टी आहेत. सत्तेचा गैरवापर आहे. त्यांच्या मनासारखी टीका आणि राजकारण कोणी करत नाही. म्हणून टोकाची भूमिका घेतली जाते. महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळाचे मंत्री तुरुंगात टाकले. राऊत साहेबांनी आपल्या लेखणीने सरकारच्या चुकीच्या धोरणावर आवाज उठवला. त्यांना तुरुंगात टाकले. अनिल देशमुख यांना तुरुंगात टाकले. आज झारखंडचे मुख्यमंत्री त्यांच्या विचारांचे नाही, म्हणून मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना ८ नोटीसा टाकल्या. त्यांना देखील तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या मंत्रिमंडळातील ३ मंत्र्यांना तुरुंगात टाकले. जिथे तुमच्या मनाविरुद्ध वागतात. तुमची भूमिका स्वीकारत नाही. त्या ठिकाणी सत्तेचा गैरवापर करून तुरुंगात टाकण्याची कामगिरी आजचे हे सरकार करत आहे. आणि त्यामुळे, यात बदल केला पाहिजे. आणि तो बदल करायचा असेल तर ती संधी मतदानाच्या निमित्ताने आपल्यासमोर आलेली आहे. असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

पवार म्हणाले की, 2 दिवसांपूर्वी भाजपाच्या एका खासदाराने दिल्लीमध्ये लोकांसमोर मत मागताना सांगितले, या देशातली घटना आम्हाला बदलायची आहे. आणि घटना बदलण्यासाठी मोदींना शक्ती द्या. विजयी करा. जे घटना बदलण्याचा विचार करतात. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना लिहून या देशाचे ऐक्य मजबूत ठेवले. सामान्य माणसाचा अधिकार हा निदर्शनास आणला. आज त्याच घटनेवर संकट आणण्याचे काम मोदी आणि त्यांचे सहकारी करत आहेत. आणि म्हणून याला उत्तर एकच आहे की, समविचारी लोकांनी एकत्र आले पाहिजे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस असेल, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना असेल, काँग्रेस पक्ष असेल, भारतीय कम्युनिस्ट पार्टी असेल, राजकीय अन्य पक्ष असतील, आम्ही निकाल घेतला की, आम्ही एकत्र राहू. देशाला पर्याय देऊ. आणि देशाच्या ऐक्याला सुरुंग लावणारी, देशाच्या हिताची जपवणूक न करणारी जी मोदीवादी शक्ती आहे. त्यात बदल केल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही आणि त्याच कामाची सुरुवात आम्ही आता तुमच्या पासून या ठिकाणी करत आहोत. असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

शरद पवार म्हणाले की, निफाड आणि हा परिसर, इथला शेतकरी हा कष्टकरी शेतकरी आहे. रोज नवनवीन संकल्पना राबवणार हा शेतकरी आहे. अनेक गोष्टी यांनी दाखवलेल्या आहेत आणि मी स्वतः पाहिलेल्या आहेत. आणि म्हणून तुमच्या पासून या बदलाची सुरुवात हा करण्याचा निर्धार आम्ही सर्वांनी या ठिकाणी करू असेही शरद पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

BJP Candidate List : भाजपची दुसरी यादी जाहीर, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, मुरलीधर मोहोळ यांच्यासह 20 जणांची नावं

Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनातील पाटी बदलली..

Rahul Gandhi | आदिवासीच देशाचे खरे मालक; जल, जंगल, जमीन हा हक्क काँग्रेस अबाधित ठेवणार