Mangal Prabhat Lodha | परदेशात जेवढी प्रसिद्धी मोदींना मिळते तेव्हढीच प्रसिद्धी रामदास आठवलेंना ही मिळते

Mangal Prabhat Lodha | आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीचा भव्य महिला मेळावा आज मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात  उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) उपस्थित होते. तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) व त्यांच्या पत्नी सीमाताई आठवले आणि माजी मंत्री अविनाश महातेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .

याप्रसंगी बोलताना मंगल प्रभात लोढा म्हणाले रामदास आठवले यांचे  व्यक्तिमत्व वेगळे आहे म्हणून मी त्यांना मानतो. गोरगरिबांसाठी कणव आणि कणा असलेला नेता म्हणून मी त्यांना मानतो. परदेशात मोदींसोबत रामदास आठवले गेले असता मोदींना जेवढी प्रसिद्धी तिथल्या वृत्तपत्रांनी दिली तितकीच प्रसिद्धी रामदास आठवलेंनाही दिली याबाबत ची आठवण ना.लोढा यांनी  सांगितली.

याप्रसंगी बोलताना रामदास आठवले म्हणाले  महिलांच्या हक्कासाठी संसदेत मी जाणार तुमचे हक्क घेऊन पुन्हा परत येणार. असे म्हणत ते पुढं म्हणाले महिलांनी गृह उद्योग सुरू केले पाहिजेत…. कुटुंब चांगलं राहण्यासाठी आता महिलांनी सुद्धा छोटे मोठे लघु उद्योग उभारून स्वयंरोजगार करणे आवश्यक आहे असं मत त्यांनी मांडलं… आपल्या महिलांनी बचत गट सुरू केले पाहिजेत असा सल्ला त्यांनी दिला. आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या….याप्रसंगी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Sharad Pawar | ‘दहा वर्षाच्या कृषिमंत्री पदाच्या कार्यकाळात शरद पवार यांनी एकही शेतकरी हिताचे कार्य केले नाही’

Baramati Lok Sabha Elections | बारामतीमधील लढाई लक्ष्यवेधी ठरणार; अजितदादांच्या पुढच्या चालीकडे सर्वांचे लक्ष

Devendra Fadnavis | विकासपूरक धोरणामुळे २०४७ पर्यंत महाराष्ट्राची २ ट्रीलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल शक्य