ज्ञानवापी वाद : आता ऐतिहासिक वस्तुस्थिती समोर येणं गरजेचं- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

मुंबई – काशी विश्वनाथ मंदिर- ज्ञानवापी मशिदीबाबत (kashi vishwanath mandir – gyanwapi masjid) वाद सुरू असतानाच, या प्रकरणी वस्तुस्थिती उघड होऊ द्यायला हवी़, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (Rashtriya Swayamsevak Sangh) बुधवारी सांगितले. संघाचा माध्यम विभाग असलेल्या विश्व संवाद केंद्रातर्फे आयोजित देवर्षी नारद पत्रकार सन्मान (Narad Journalist Honours) समारोहात बोलताना संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर (Sunil Ambekar) यांनी याबाबत वक्तव्य केलं.

“या प्रकरणी काही गोष्टी बाहेर येत आहेत. तुम्ही किती काळ सत्य दडपून ठेवू शकता? ते उघडकीस येतंच. मला वाटतं आता ऐतिहासिक वस्तुस्थिती समोर येणं गरजेचं आहे,”; असं आंबेकर यांनी म्हटलं.या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री संजीव बलियानदेखील उपस्थित होते.

त्यांनी म्हटलं, गेल्या आठवड्यात ग्यानवापीचा सगळा विषय सुरू असताना मी खूप भावूक झालो होतो. नंतर जेव्हा एका पत्रकाराने मला सांगितलं की, इथे नंदी गेल्या अनेक शतकापासून शंकराची वाट पाहत आहे, तेव्हा माझे डोळे भरून आले.असं ते म्हणाले.