मांगी सोसायटी संजय शिंदे गटाकडे; बागल गटाला होम पीच वर जोरदार धक्का

करमाळा – माजी मंत्री स्वर्गीय दिगंबरराव बागल (The late Digambarrao Bagal) यांच्या गावातीलच मांगी विविध कार्यकारी सोसायटीचे (Mangi Various Executive Societies)  निवडणुकीत आमदार संजय शिंदे (MLA Sanjay Shinde) गटाने सुजित बागल (Sujit Bagal) यांच्या नेतृत्वाखाली पॅनल 13 पैकी अकरा जागा जिंकत बागल गटाला त्यांच्या राहत्या गावातच जबरदस्त धक्का दिला आहे.

मांगी सोसायटीची निवडणूक खुद्द माजी आमदार शामल बागल (Shamal Bagal) यांनी प्रतिष्ठेची केली होती त्यांनी या निवडणुकीसाठी स्वतः उमेदवारी अर्ज भरला होता मात्र ब्रह्मदेव माने सहकारी बँकेचे थकबाकीचे ऑब्जेक्शन घेऊन सुजित बागल यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज बाद केला होता. सुजित बागल यांच्याकडे जयवंत मल्टीस्टेट ची बाकी आहे असे सांगत त्यांच्या अर्जावर आक्षेप बागल गटाकडून घेण्यात आला होता मात्र यावेळी सुजित बागल यांनी एकरकमी कर्जफेड करून आपला अर्ज मंजूर करून घेतला होता

या निवडणुकीत बागल यांच्या गटाला नारायण पाटील गटाचे समर्थक देवानंद बागल यांनी पाठिंबा दिला होता. नारायण पाटील गट व बागल गट एकत्र असताना आमदार संजय शिंदे गटाने दोघांनाही धोबीपछाड देत तेरापैकी 11 जागा जिंकून एक हाती संस्था ताब्यात घेतली आहे. या मांगी सोसायटी मधूनच बागल गटाचे जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज जात असतो मात्र तेथेच त्यांना ब्रेक लावण्याचे काम आमदार संजय शिंदे यांनी केले आहे.

हा तर कामाचा विजय – सुजित बागल

आमदार संजय मामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीने मांगी गावात काम चालू असून प्रत्येक गावकरी कष्टकऱ्यांच्या समस्या सोडवल्या जात आहेत सोसायटीच्या माध्यमातून कोणतेही राजकारण न करता चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळे मांगी तील जनतेने आमदार संजय मामा शिंदे यांच्यावर विश्वास ठेवत आमच्या पॅनलला निवडून दिले उसाचा गंभीर प्रश्न आमदार संजय शिंदे यांनी सोडविला आहे.