मृत्यूशी झुंज देणाऱ्या चेतनच्या मदतीस धावली महाराष्ट्र नवनिर्माण सेना

पुणे –  २ जानेवारी रोजी मुंढवा परिसरात १२ वर्षीय चेतन डोक्यात लोखंडी सळई पडून झालेल्या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता.  हा अपघात परिसरात चालू असलेल्या केबल जोडण्याच्या कामामुळे झाला होता संबंधित केबल व्यवसायिक व त्याच्या कामगारांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली होती.

आता हा अपघात कसा झाला कशामुळे झाला हे जाणून घेण्यापेक्षा सद्य परिस्थितीमध्ये मुलाचा जीव वाचवणे अत्यंत महत्त्वाचे व गरजेचे असून त्याची घरची परिस्थिती देखील अत्यंत बिकट स्वरूपाची आहे हे कळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेना केबल सेना पुणे शहर यांच्या वतीने शहर व पिंपरी चिंचवड परिसरातील केबल व इंटरनेट व्यवसायिकांना मदतीचे आवाहन करण्यात आले होते, त्यानुसार सर्व व्यावसायिकांनी मदतीस पुढाकार घेऊन मदत केली.

जमा झालेली संपूर्ण मदत आज मनसे मध्यवर्ती कार्यालय येथे त्याचे वडील महेश गाढवे यांना सुपूर्त करण्यात आले,अशी माहिती मनसे केबल सेना अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी दिली. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून इथून पुढे हि आवश्यक मदत करता येईल ती आम्ही करू अशी ग्वाही यावेळी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी मुलाच्या पालकांना दिली.

यावेळी पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे,गटनेते साईनाथ बाबर,पुणे शहर महिला अध्यक्ष वनिता वागस्कर,हडपसर विभाग अध्यक्ष अमोल शिरस,मनसे केबल सेना पुणे शहर अध्यक्ष दीपक चव्हाण मनसे केबल सेना परिवार व मनसे पदाधिकारी उपस्थित होते.