‘कावळ्याने कितीही शाप दिला तरी जनावर मरत नसतं हे मिटकरीने लक्षात घ्यावं’

मुंबई – शिंदे फडणविस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाल्या नंतर खाते वाटप सुध्दा झाले. कुणा मध्ये नाराजी नाही ना रुसवा फुगवा नाही, पण राष्ट्रवादी पक्षाचे आ. श्री अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी काही संबंध नसतांना शिंदे गटात नाराजी आशी दिलेली प्रतिक्रिया म्हणजे शेजाऱ्याच्या घरातल भांडण खिडकीच्या छिद्रा मधून पाहण्यासारख असून त्यांना बहुधा शिंदे गटाच प्रवक्ते होण्याचे डोहाळे लागल्या सारख वाटत अशी टीका भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी (Ram Kulkarni) यांनी केली आहे.

ते म्हणाले, वास्तविक पाहता मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप हा शिंदे फडणवीस सरकारचा अंतर्गत प्रश्न आहे. काही दिवसापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर खातेवाटपही रीतसर झालं, खाते वाटपावर शिंदे गटात कोणी नाराज, विनाकारण अमोल मिटकरी यांच्यासारखी माणसं शिंदे गटाची सुपारी घेतल्याप्रमाणे नाराजीचे भाकीत व्यक्त करून भविष्यवाणी करू लागले. खरं पाहता दुसऱ्याच्या घरातलं भांडण वाकून पाहणे ही फार मोठी दुर्दैवाची गोष्ट म म्हणावी ज्यांना खाते मिळाली त्या सर्व मंत्र्यांनी आम्ही कुठेच नाराज नाही अशा प्रकारचा जाहीर खुलासा केला. पण मंत्र्याची नाव घेऊन मिटकरी यांनी व्यक्त केलेली भावना याचा अर्थ कदाचित मिटकरींना शिंदे गटाचं प्रवक्ते होण्याचे डोहाळे लागले? असावेत.

मुळामध्ये खाते वाटपाच्या प्रश्नावर मिटकरी ना बोलण्याचा अधिकारच नाही. कारण हा प्रश्न सत्ताधाऱ्यांच्या अंतर्गत पक्षातला होय कुठल्याही प्रश्नावर भाजपवर (BJP) टीका करायची, भाजप नेतृत्वावर हल्ला, आणि हे सर्व केल्यानंतर आपल्याला प्रसिद्धी मिळते आपण बारामतीच्या नजरेत चांगले? हा जो त्यांच्यातला अहंभाव आहे तो राजकीय दृष्ट्या बालिशपणाचा म्हणावा लागेल. खर पाहता योग्य ते बोलावं असा सल्ला काही दिवसापूर्वी त्यांना त्यांचे नेते राज्याचे विरोधी पक्ष नेते मा. अजित दादा पवार (Ajit Pawar) यांनी दिलेला होता . बाकी काही असलं तरी मिटकरी यांच्या भविष्यवाणी मुळे सरकार काही पडणार नाही. कारण कावळ्याने कितीही शाप दिला तरी जनावर मरत नसतं हे मिटकरीने लक्षात घ्यावं. असं देखील ते म्हणाले.