मन जिंकलंस..! नुकताच बाप बनलेल्या बुमराहला पाकिस्तानी गोलंदाज आफ्रिदीने दिली खास भेट

Shaheen Afridi Gift To Jasprit Bumrah: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वडील झाला आहे. आशिया चषकादरम्यान या खास प्रसंगी तो पत्नी संजना गणेशनसोबत (Sanjana Ganeshan) राहण्यासाठी मुंबईलाही गेला होता. यासाठी तो नेपाळविरुद्धचा सामनाही खेळू शकला नाही. ही आनंदाची बातमी त्याने चाहत्यांसोबत शेअर केली. यानंतर तो पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी श्रीलंकेला परतला.

वडील झाल्यानंतर बुमराहवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, रविवारी पावसामुळे पाकिस्तानविरुद्धचा सामना राखीव दिवशी खेळवण्याचा निर्णय झाला तेव्हा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने (Shaheen Afridi) बुमराहला खास भेट दिली. हा व्हिडिओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही शेअर केला आहे.

कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर पहिल्यांदा वडील बनल्याबद्दल शाहीन आफ्रिदीने जसप्रीत बुमराहला खास भेट दिली. आफ्रिदीने हा व्हिडिओ त्याच्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरही शेअर केला आहे. शाहीनने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये प्रेम आणि शांती असे लिहिले आहे. मुलाच्या जन्माबद्दल जसप्रीत बुमराह आणि त्याच्या कुटुंबाचे अभिनंदन. सर्व बुमराह कुटुंबियांसाठी प्रार्थना. आम्ही केवळ मैदानावर एकमेकांच्या विरोधात आहोत. मैदानाबाहेर आपण फक्त माणसं आहोत, असे लिहिले आहे.

या ट्विटवर जसप्रीत बुमराहची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्याने उत्तर दिले, सुंदर हावभाव, मी आणि माझे कुटुंब या प्रेमाने भारावून गेलो आहोत! सदैव शुभेच्छा. यावर पाकिस्तानी चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. बुमराहच्या प्रतिक्रियेने सर्वजण खूश आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-