Manoj jarange patil | लोकसभा नव्हे मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणूक लढवणार, वाचा काय म्हणालेत?

Manoj jarange patil | सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुक २०२४ ची तयारी सुरू आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधक महाविकास आघाडीद्वारे निवडणुकीची तयारी सुरू आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी देखील लोकसभा लढवण्याची तयारी दाखविली होती. लोकसभेत एक अपक्ष उमेदवार देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र आता त्यांनी लोकसभा लढवणार नाही, असे म्हणत आपली भूमिका मांडली आहे.

जरांगे पाटील म्हणाले की, ‘मराठा समाज आता हुशार झाला आहे आणि लोक म्हणाले म्हणून आता काम नाही करायचे. आम्ही लोकांपर्यंत पोहचू शकत नाही आणि आणि आमच्याकडे 40 उमेदवार उभे करण्याचा डेटा नाही. काही करायला लागले तर जात संपेल, आणि समाजाची हानी होईल. राहिलेले आरक्षण द्यायला मी खंबीर आहे. मराठा समाजाने कुणाच्याही प्रचाराला जायचे नाही. बारकाईने लक्ष ठेवायचे आता करेकट कार्यक्रम लावायचा.’

‘उद्यापासून विधानसभेच्या तयारीला लागायचे आहे. आम्हाला जे लागते ते द्या मग तुम्ही उताणे पडा किंवा सरळ पडा. आम्हाला राजकारणाशी काही देणे घेणे नाही. तुम्ही करत नाहीत आणि तुम्हीच आम्हाला राजकारणात ढकलत आहात. 112 पेक्षा जास्त विधासभेच्या जागा लढवनार आहोत, असे मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil ) यांनी स्पष्ट केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शिवसेना शिंदे गटाने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी, पाहा कोणाला मिळालं तिकीट?

Nana Patole | लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज

Prakash Ambedkar | ‘वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला’! आंबडेकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल