राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने आणले चित्रा वाघ यांना अडचणीत? जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण?

बीड : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mehboob Shekh) यांनी भाजपच्या नेत्याचित्रा वाघ यांच्यावर अब्रूनुकसणीचा दावा दाखल केला आहे. शेख यांच्यावर औरंगाबाद येथील एका महिलेने बलात्काराचा आरोप केला होता त्यावरून चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत मेहबूब शेख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याच दरम्यान चित्रा वाघ यांनी बलात्कारी असा उल्लेख केल्याने मेहबूब शेख यांनी बीड न्यायालयात धाव घेतली होती. त्यावरून चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर दाखल केलेला अब्रूनुकसानीचा दावा स्वीकृत केला आहे.

शिरूर कासार न्यायालयाने मेहबूब शेख यांचा दावा स्वीकृत केला आहे. मेहबूब शेख यांनी पन्नास लाख रुपयांचा दावा दाखल केला होता. भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर दाखल केलेला अब्रूनुकसणीचा दावा दाखल केल्यानं वाघ यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. टीव्ही 9 माराठीने याबाबत वृत्त दिले आहे.