मंत्री छगन भुजबळ यांनी रुग्णालयात घेतली आमदार सरोज आहिरे यांची भेट

नाशिक  :- देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे (Devalali Constituency MLA Saroj Ahire) यांची तब्येत बरी नसल्याने त्यांच्यावर नाशिक शहरातील संजीवनी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहे. आज मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांची रुग्णालयात भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, संजय खैरनार, कैलास मुदलीयार, चिन्मय गाढे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी संजीवनी रुग्णालयाचे डॉ.अमेय कुलकर्णी, डॉ.मधुर केळकर कुलकर्णी यांच्याशी आमदार सरोज आहिरे यांच्यावर सुरू असलेल्या उपाचाराबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच आवश्यकता असल्यास मुंबईच्या तज्ञ डॉक्टरांशी चर्चा करून अधिक तपासण्या करून आवश्यकतेनुसार मुंबईला उपचार घ्यावा असे त्यांनी सांगितले.