चुन चुन के मारे जायेंगे, गिन गिन के मारे जायेंगे; आमदार गायकवाड यांचा ठाकरे गटाला इशारा

बुलढाणा : राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा सामना सुरु आहे.  मात्र मुद्द्यांची लढाई आता गुद्द्यांवर आली आहे. यातच काल   बुलढाण्यात (Buldana Shiv sena News) शिवसेना विरुद्ध शिंदे गटात जोरदार राडा झाला आहे. शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्काराचा कार्यक्रम सुरू असताना अचानक आमदार संजय गायकवाड यांचे कार्यकर्ते तेथे आल्याने दोन्ही गट आमोरासमोर भिडले.

शिवसेनेचे पक्ष प्रमुख या नात्याने उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) बुलढाण्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या केल्या होत्या. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी हा राडा झाला. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी अखेर पोलिसांना लाठीचार्जही (Buldana Lathi Charge) करावा लागला. कार्यकर्ते पोलिसांसमोरच भिडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, हल्ला केलेले हे कार्यकर्ते शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचे असल्याचा आरोप संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी केला. त्यावर आमदार गायकवाड यांनीही हे आपलेच कार्यकर्ते असल्याचे मान्य करत या हल्लाचे समर्थनही केले. तसेच पुढच्या वेळी चुन चुन के मारे जायेंगे, गिन गिन के मारे जायेंगे, असे म्हणतं ठाकरे गटाला इशाराही दिला आहे.

संजय गायकवाड म्हणाले, शिवसेना, संजय गायकवाड आणि त्याचे कार्यकर्ते किती पागल आहेत हे त्यांना अजून माहित नाही. आग्या मोहोळसारखे डसणारे कार्यकर्ते आहेत. हे जर चिडले तर कोणाच्या बापालाही ऐकणार नाहीत. त्यानंतरही जर यांनी काही भानगड करण्याचा प्रयत्न केला तर चुन चुन के मारे जायेंगे, गिन गिन के मारे जायेंगे.

यापुढे त्यांनी काही केवळं करुन दाखवावचं, मग सांगेन आम्ही काय चीज आहोत. ते जे म्हणतं आहेत आम्ही असं करु, तसं करु, तुम्ही करुनच दाखवा. आज त्यांचे भाग्य होते की पोलिसमध्ये होते, अन्यथा सगळा हिशोब चुकता केला असता.

गायकवाड म्हणाले, आमचे आजही आवाहन आहे की तुम्ही तुमचा पक्ष चालवा, आम्ही आडवं येत नाही. तुमची विचारधारा काँग्रेस-सेनेची आहे. ती तुम्ही संभाळत बसा, फक्त जाहीर कार्यक्रमांमध्ये आमचे उल्लेख नको. पण सांगून समजत नसेल तर शिवसैनिकाला दुसरी भाषा येत नाही.आता ठाकरे गटाने तक्रार दिली तर आम्ही पण देणार. ते जेवढी नाव देतील तेवढीच नाव आम्ही पण देणार. कारण शेवटी कायदा सर्वांसाठी सारखाचं आहे. आमची लोकं काही भांडण करायला गेले नव्हती. ते जर अपशब्द बोलले तर समज द्यायाला गेले होते. पण तेच हातघाईवर आले, मग काय जंग मे सब जायज होता है, असेही समर्थन गायकवाड यांनी केले.