एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्यानंतर राऊतांनी केला दिल्ली दौरा रद्द

मुंबई – विधान परिषदेच्या निकालाने (Results of the Legislative Council) महाविकास आघाडीला (MVA) झटका बसला असून, शिवसेनेतील महत्त्वाचे नेते आणि सध्या कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे गुजरातमध्ये (Eknath Shinde in Gujarat) गेले आहेत. ते सध्या नॉट रिचेबल असून, सध्या ते सुरतमधील ली मेरिडिअन या हॉटेलमध्ये (Le Meridien Hotel) आहेत.

एकनाथ शिंदे निकालानंतर सोमवारी रात्रीच गुजरातमध्ये गेले.  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे समर्थक आमदारांसह सुरतमध्ये एका हॅाटेलमध्ये असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच १३ आमदार असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे अचानक नॉट रिचेबल झाल्याने आता शिवसेनेतील नेत्यांची खदखद पुढे आली आहे.

गेले काही वर्ष नाराज असलेले शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि त्याच्या गटाचे आमदार यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे अशी माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांचा नाराज गट काल सायंकाळपासूनच नॉट रिचेबल असल्याची माहिती  आहे. दरम्यान, राष्ट्रपती निवडणुकीसाठी (Presidential election) शरद पवारांनी (Sharad Pawar) आयोजित केलेल्या बैठकीसाठी आज संजय राऊत (Sanjay Raut)  दिल्लीला रवाना होणार होते. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्यानंतर राऊतांनी दिल्ली दौरा रद्द करत महाराष्ट्रात थांबणार आहेत. शिवसेनेत फूट पडली असल्याच्या चर्चानंतर आता पक्ष डॅमेज कंट्रोलसाठी काय पाऊलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.