शरद पवारांच्या हातून आणखी एक मोहरा निसटला; आणखी एक आमदार अजितदादांसोबत

नाशिक – राज्याच्या राजकारणात अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडानंतर मोठा भूकंप झाला आहे. या भूकंपाचे धक्के केवळ राष्ट्रवादीच नव्हे तर सर्वच प्रमुख पक्षांना अजूनही बसत आहेत. नाशिकमधील देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे.(MLA Saroj Ahire has supported Ajit Pawar).

नाशिकमध्ये ‘शासन आपल्या दारे’ या उपक्रमासाठी अजित पवार नाशिकमध्ये पोहोचले. यावेळी सरोज अहिरे यांनी अजित दादांचे स्वागत केले.शरद पवार हे मोठे नेते आहेत. ते मला वडिलांसारखे आहेत. तर, अजितदादा यांनी मला भावासारखे प्रेम दिले. त्यामुळे मनस्थिती द्विधा होती. पण, मतदारसंघात चर्चा करून अजित दादा यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असे त्या म्हणाल्या.

मतदारसंघाचा विकास खुंटला आहे. अनेक विकास कामे थांबली आहेत. या कामांना गती मिळण्यासाठी सत्तेत राहणे आवश्यक आहे. त्यामुळे मतदारसंघातील नागरिकांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतला असे त्या म्हणाल्या. दरम्यान, लक्षणीय बाब म्हणजे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील अनेक आमदारांनी अजितदादांसोबत जाण्याची आपली भूमिका जाहीर केली होती. मात्र सरोज अहिरे या तटस्थ होत्या.