मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी या दोघांनाही अटकपूर्व जामीन मंजूर

मुंबई –जवळपास तीन आठवड्यांपासून ‘नॉट रीचेबल’ असणारे मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी (MNS leaders Sandeep Deshpande and Santosh Dhuri)  या दोघांना मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यासोबतच न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या संतोष साळवी आणि देशपांडे यांच्या गाडीच्या चालकाला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

संदीप देशपांडे आणि संतोष धुरी या दोघांनी पोलिसांना गुंगारा देऊन पळण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी एक महिला पोलीस कर्मचारी खाली पडली. त्यानंतर पोलिसांना गुंगारा देऊन पळ काढल्या प्रकरणी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अटकपूर्व जामिनासाठी या दोघांनीही अर्ज केला होता.