वादग्रस्त पोस्ट करून चर्चेत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न करणाऱ्या मुग्धा कर्णिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Mugdha Dhananjay Karnik : श्री रामदास स्वामी संस्थानचा सांप्रदायिक दासनवमी भिक्षा प्रचार दौरा मुंबई येथे सुरु आहे. यातच आता मुंबई विद्यापीठाच्या सेवानिवृत्त प्राध्यापिका मुग्धा धनंजय कर्णिक यांनी याबाबत तसेच प्रभु श्रीराम आणि समर्थ रामदासांबाबत आक्षेपार्ह मजकूर आपल्या फेसबूक पेजवरून पोस्ट केला आहे.

सदर पोस्टमधील मजकूरामुळे धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी समर्थ व्यासपीठ संस्थेचे समन्वयक सुहास क्षीरसागर यांच्यासह अन्य समर्थभक्तांनी मुग्धा कर्णिक यांच्याविरोधात दि. १२ फेब्रुवारी रोजी एफआयआर नोंदविला आहे.

मुग्धा धनंजय कर्णिक (Mugdha Dhananjay Karnik) या नेहमीच वादग्रस्त पोस्ट करून चर्चेत राहण्याचा केविलवाणा प्रकार करत असतात. नुकतीच त्यांनी आपल्या मुग्धा धनंजय नामक फेसबूक पेजवर लिहिताना श्रीसमर्थ रामदास स्वामी, श्रीसंप्रदाय यांचा उल्लेख करत भीक्षा मागण्याच्या प्रक्रियेला भीक मागण्याचा प्रकार म्हणत त्यासंदर्भात आक्षेपार्ह टिपण्णी केली होती. तसेच सज्जनगड संस्थानचाही उल्लेख करत संत रामदास, प्रभु श्रीराम आणि हिंदु धर्माविषयी शिव्या देत आक्षेपार्ह आणि बीभत्स पोस्ट समाज माध्यमावर प्रसारित करून हिंदु धर्माच्या श्रद्धेचा आणि भावनांच्या अपमान केल्याचे दिसत आहे. सदर प्रकरणी पुणे शहर सायबर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता १८६० – कलम २९५ ए व कलम ५०० अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला आहे.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष शेलार…; भाजप प्रवेशानंतर बोलताना अशोक चव्हाणांकडून चूक, फडणवीसही हसून बेजार

छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजन समाजाचे राजे, Chhagan Bhujbal यांचे मोठे वक्तव्य

Rajya Sabha Elections | राज्यसभेसाठी शरद पवार मास्टरस्ट्रोक मारण्याच्या तयारीत, छत्रपती शाहू महाराजांना देणार उमेदवारी!