‘शमीला अटक नका करू’, ‘त्याच्यावर गुन्हा दाखल होणारच’… मुंबई-दिल्ली पोलिसांनी असं का म्हटलं?

Mohammad Shami: विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या (IND vs NZ Semi Final) सामन्यात न्यूझीलंडचा (India vs New Zealand) 70 धावांनी पराभव करून भारताने चौथ्यांदा या जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 4 गडी गमावून 397 धावा केल्या होत्या, तर न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 48.5 षटकात 327 धावा करत सर्वबाद झाला होता. भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने अप्रतिम गोलंदाजी करत 57 धावांत 7 बळी घेतले.

शमीच्या या शानदार कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोशल मीडियावर शमी अजूनही ट्रेंडमध्ये आहे. शमीच्या कामगिरीबद्दल, दिल्ली पोलिसांनी मुंबई पोलिसांना टॅग केले आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट केली जी व्हायरल झाली. सामन्यानंतर दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) लिहिले की, ‘मुंबई पोलीस, आम्हाला आशा आहे की आज झालेल्या हल्ल्यासाठी तुम्ही मोहम्मद शमीला अटक करणार नाही.’

मुंबई पोलिसांनीही दिल्ली पोलिसांच्या पोस्टला तत्काळ प्रतिसाद देत लिहिले, ‘दिल्ली पोलिस, तुम्ही असंख्य लोकांची मने चोरण्यासाठी कलम लावायला विसरलात आणि सहआरोपींची यादीही दिली नाही.’ येथे मुंबई पोलिस सामनाच्या नायक विराट कोहली, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, केएल राहुल यांच्याकडे बोट दाखवत होते, ज्यांच्याबद्दल दिल्ली पोलिसांनी कोणताही शोध घेतला नव्हता. काही वेळातच ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली.

महत्वाच्या बातम्या-

Apple लवकरच OLED डिस्प्लेसह IPad Air आणि IPad Pro चे दोन नवीन मॉडेल लॉन्च करणार?

Latur News : महाराष्ट्राची मान शरमेने झुकली; सत्तरी ओलांडलेल्या मौलानाने केले मोठे कांड

पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रज्जाकने ऐश्वर्यावर केली अश्लील टिप्पणी केली,म्हणाला,…