BREAKING : मुकेश अंबानींच्या कुटुंबाला धमकीचे फोन, पुढील 3 तासांत जीवे मारण्याची धमकी

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. चार ते पाच फोन आल्याची माहिती आहे. पोलीस चौकशी करणार असल्याची माहिती आहे. हे सगळे फोन आजच आलेत. स्वातंत्र्यदिनी त्यांना असे धमकीचे फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अंबानी कुटुंब या प्रकरणी पोलिसात तक्रार देणार असल्याची माहिती आहे. डी. बी मार्ग पोलीस स्टेशन (D. B Marg Police Station) इथं ते तक्रार दाखल करणार असल्याची माहिती आहे. रिलायन्स हॉस्पिटलच्या (Reliance Hospital) लॅन्डलाईनवरून ही धमकी देण्यात आल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रिलायन्स फाऊंडेशन हॅास्पिटलमध्ये हे फोन करण्यात आले होते. एकूण 8 फोन करण्यात आले होते. या अज्ञात व्यक्तीने मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयाला जीवे मारण्याची धमकी दिली. या व्यक्तीने एकापाठोपाठ असे 8 फोन कॉल केले होते, या प्रकारानंतर आम्ही डीबी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती , रिलायन्स फाऊंडेशन हॅास्पिटलच्या डॉ. तरंग ज्ञानचंदानी यांनी दिली. फोनवर धमकी देणाऱ्या व्यक्तीने आपलं नाव अफजल असल्याचे सांगितले.