गंगाखेड अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयात स्वातंत्र्य दिन साजरा

गंगाखेड / विनायक आंधळे :- देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने ‘आझादी का अमृत महोत्सव’ (Azadi Ka Amrit Mahotsav) या संकल्पनेवर देशभर आनंदोत्सव साजरा केला जात आहे. 15 ऑगस्ट 1949 रोजी देश ब्रिटिश सरकारच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. स्वातंत्र्य मिळाल्यापासून हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचा राष्ट्रध्वज (National Flag) लाल किल्ल्यापासून ते देशातील सरकारी कार्यालयापर्यंत फडकावला जातो.

गंगाखेड (Gangakhed) अप्पर जिल्हा व सत्र न्यायालय (Upper District Court and Sessions Court) येथे मोठ्या थाटामाटात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी अप्पर जिल्हा  व सत्र न्यायाधीश इनामदार साहेब, वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश सय्यद साहेब, अतिरिक्त अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश गायकवाड साहेब,  क स्तर न्यायाधीश गुट्टे साहेब, बिरादार मॅडम, तसेच नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायाधीश मोहोळकर मॅडम, यांच्यासह न्यायालयातील कर्मचारी  वर्ग, वकील, कनिष्ठ विधीज्ञ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित.