धक्कादायक! मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल यांची आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये लिहिले…

मुंबई: महाराष्ट्राची राजधानी मुंबई (Mumbai) येथून धक्कादायक वृत्त पुढे आले आहे. मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक पारस पोरवाल (Paras Porwal) यांनी आत्महत्या (Paras Powal Suicide) केल्याची घटना गुरुवारी (२० ऑक्टोबर) घडली आहे. राहत्या इमारतीच्या तब्बल २३व्या मजल्यावरून उडी मारत त्यांनी आत्महत्या केली आहे. व्यवसायात झालेल्या आर्थिक नुकसानीतून त्यांनी हे धक्कादायक पाऊल उचलले आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

पारस पोरवाल हे ५७ वर्षांचे होते. दक्षिण मुंबईतील भायखळा येथे त्यांचे निवासस्थान होते. व्यवसायातील आर्थिक तोट्यातून त्यांनी आज सकाळी राहत्या इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून उडी मारली आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच काळाचौकी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी धावून आले.

पारस पोरवाल यांनी आत्महत्या केली असल्याचे समजताच पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात पोलिसांना पारस पोरवाल यांच्या जिमच्या खोलीत त्यांनी लिहिलेली सुसाइड नोट सापडली आहे. या सुसाइड नोटमध्ये आपल्याला व्यवसायात झालेल्या आर्थिक नुकसातून आपण हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे त्यांनी लिहिले आहे.