मुंबई इंडियन्सने किरॉन पोलार्ड केले रिलीज; चेन्नईने जडेजाबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय 

मुंबई –  इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 16 व्या हंगामाच्या लिलावापूर्वी, संघांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (BCCI) कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्यास सुरुवात केली आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सनेही त्यांची यादी बीसीसीआयकडे सोपवली आहे. दोन्ही संघातून सोडण्यात आलेल्या आणि कायम ठेवण्यात आलेल्या खेळाडूंबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मुंबईने ट्रेडींगच्या माध्यमातून नवीन खेळाडूंना करारबद्ध केले आहे, पण चेन्नईने अद्याप ट्रेडिंगद्वारे एकाही खेळाडूची देवाणघेवाण केलेली नाही.

मुंबईने पोलार्डला सोडले
12 वर्षांपासून खेळत असलेला कॅरेबियन अष्टपैलू खेळाडू केरॉन पोलार्डला सोडण्याचा निर्णय मुंबईने घेतला आहे. गेल्या मोसमात पोलार्डची कामगिरी काही विशेष नव्हती. पोलार्ड व्यतिरिक्त मुंबईने कॅरेबियन अष्टपैलू फॅबियन ऍलन आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज टायमल मिल्स यांनाही सोडले आहे. मुंबईने ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून करारबद्ध केले आहे.

दरम्यान, चेन्नईने रवींद्र जडेजाला आपल्यासोबत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. गेल्या मोसमातील वादानंतर, जडेजा या हंगामात चेन्नई संघाकडून खेळणार नसल्याचा दावा अनेक अहवालांमध्ये करण्यात आला होता, परंतु फ्रँचायझीने हे वृत्त चुकीचे सिद्ध केले आहे. अखेरच्या क्षणी दोन्ही बाजूंमध्ये समझोता झाला. मात्र, काही परदेशी खेळाडूंना संघातून मुक्त करण्यात आले आहे. ख्रिस जॉर्डन, अॅडम मिलने आणि मिचेल सँटनर या खेळाडूंचा समावेश आहे.