Narendra Modi Speech | गेल्या दहा वर्षांत भारतानं मिळवलेल्या यशाकडे विरोधक दुर्लक्ष करत आहेत

Narendra Modi Speech | महागाई नियंत्रण, अर्थव्यवस्था वाढीला चालना, पायाभूत सुविधांवर सर्वाधिक भांडवली खर्च आणि रोजगारनिर्मिती याबाबत सरकारनं अनेक धाडसी निर्णय घेऊन उपाययोजना केल्या असं पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi Speech ) यांनी काल लोकसभेत सांगितलं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.

महिला, युवा, शेतकरी आणि गरीब जनतेच्या सक्षमीकरणातूनच विकसित भारताचं उद्दीष्ट साध्य होईल असं सांगून सरकारनं गरीबांसाठी ग्रामीण भागात चार कोटी तर शहरी भागात 80 लाख पक्की घरं बांधली अशी माहिती त्यांनी दिली. आगामी लोकसभा निवडणुकीत जनता भाजपाला बहुमतानं निवडून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गेल्या दहा वर्षांत भारतानं मिळवलेल्या यशाकडे विरोधक दुर्लक्ष करत आहेत असा आरोप करत देशाला सशक्त विरोधी पक्षाची गरज आहे असं ते म्हणाले. त्यानंतर सभागृहानं धन्यवाद प्रस्ताव मंजूर केला. राज्यसभेतही काल धन्यवाद प्रस्तावावर चर्चा झाली. यावेळी विरोधकांनी आर्थिक विषमता, कृषी क्षेत्रासाठीची घटत असलेली आर्थिक तरतूद याबाबत सरकारवर टीका केली.

महत्वाच्या बातम्या –

भाजप आमदाराच्या गोळीबारामुळे आणि मुख्यमंत्र्यांवरील आरोपांमुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघे मिळून मराठा आणि ओबीसी समाजाला एकमेकांविरोधात झुंझवत आहेत – Nana Patole

Atif Aslam | “पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करून दाखवाच”, मनसेचं बॉलिवूडकरांना थेट आव्हान