हार्दिकच्या ‘या’ एका अटीमुळे रोहितची कर्णधारपदावरुन हकालपट्टी, विश्वचषकापूर्वीच ठरलं होतं सर्वकाही!

Hardik Pandya Mumbai Indians Rohit Sharma Sacked Reason: मुंबई इंडियन्सने शुक्रवारी 15 डिसेंबरच्या संध्याकाळी रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून सर्वांना आश्चर्यचकित केले. रिलीझ-रिटेन्शननंतर टीममध्ये ट्रेड झालेल्या हार्दिक पांड्याला त्याचा उत्तराधिकारी म्हणून निवडण्यात आले आहे. हार्दिक पांड्या आगामी हंगामात म्हणजेच आयपीएल 2024 मध्ये (IPL 20024) पाच वेळा चॅम्पियन फ्रँचायझीचे नेतृत्व करेल. या निर्णयानंतर रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सचे चाहते प्रचंड नाराज आणि निराश दिसले. आता या मागचे महत्त्वाचे कारणही समोर आले आहे. तसेच, रोहित आता हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळणार का? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात होता, यावर एक अपडेट देखील प्राप्त झाले आहे.

मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला का काढले?
गुजरात टायटन्सने त्यांना कायम ठेवल्यानंतर काही तासांतच मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला त्यांच्या संघात सामील केले होते. हार्दिक पांड्याला कर्णधार का करण्यात आले आणि रोहित शर्माला का काढण्यात आले हे आता कळले आहे. इंडियन एक्स्प्रेसने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, हार्दिक पांड्या केवळ या अटीवर मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला होता की त्याला संघाचा कर्णधार बनवले जाईल. विश्वचषकापूर्वीच रोहित शर्माला याची माहिती देण्यात आली होती.

हार्दिकच्या नेतृत्वाखाली रोहित शर्मा खेळणार का?
याशिवाय रोहित शर्मा आगामी आयपीएलमध्ये खेळणार की नाही हेही या अहवालात समोर आले आहे. रोहित हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळणार की नाही असा प्रश्न चाहत्यांच्या मनात होता. आता विश्वचषकापूर्वी रोहितला याची माहिती देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तो हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळणार असल्याचे त्याने मान्य केले होते. म्हणजेच रोहित शर्मा आयपीएल 2024 मध्ये खेळताना दिसणार आहे. गुजरातला सलग दोनवेळा फायनलमध्ये नेऊन पहिल्या सत्रातच चॅम्पियन बनवणारा हार्दिक आपल्या जुन्या संघाला सहावे विजेतेपद मिळवून देऊ शकेल की नाही हे पाहावे लागेल.

महत्वाच्या बातम्या-

सर्व महानगरपालिका हद्दीतील मालमत्तांचे सर्वेक्षण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आरक्षणावरून आरोप प्रत्यारोप करून काही अर्थ नाही, समंजसपणे हा प्रश्न मार्गी लावा- जयंत पाटलांचे आवाहन

वैधानिक विकास मंडळांच्या पुनर्गठनासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार; उपमुख्यमंत्री पवारांची ग्वाही