चित्रा वाघ यांच्याशी पंगा घेणाऱ्या उर्फीच्या अडचणी वाढल्या; मुंबई पोलिसांनी पाठवली नोटीस

मुंबई- मॉडेल व अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यातील सोशल मीडिया वॉर चांगलेच चर्चेत आहे. चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन करणाऱ्या उर्फीवर तत्काळ कारवाईची (Chitra Wagh Complaint) मागली केली होती. त्यानंतर उर्फी चित्रा वाघ यांच्या उत्तराला प्रत्युत्तर देत होती. अगदी उर्फी आपल्याला थोबडवण्याची धमकी देणाऱ्या चित्रा वाघ यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती पुढे येत होती.

अशातच आता उर्फीवरच तिचा डाव उलटा पडणार असल्याचे दिसत आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) चित्रा वाघ यांच्या तक्रारीची दखल घेत उर्फीला नोटीस पाठवली असल्याचे समजत आहे. त्यामुळे उर्फीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन प्रकरणी मुंबई पोलिसांनी उर्फी जावेदला नोटीस (Notice To Urfi Javed) पाठवली आहे. अंबोली पोलीस ठाण्यात उर्फी जावेदची चौकशी होणार आहे. उर्फीला आज हजर होण्याची नोटिस देण्यात आली आहे. चित्रा वाघ यांच्या तक्रारीची मुंबई पोलिसांनी दखल घेतली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शैला कोराडे या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.