Murlidhar Mohol : तब्बल तीन दशकांनंतर केंद्रात मंत्रीपद मिळवणारे मुरलीधर मोहोळ बनले पुण्याचे पहिले खासदार

Murlidhar Mohol : राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप काल जाहीर झालं. नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात पुण्याचे नवनिर्वाचीत खासदार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. मोहोळ यांनी राज्याच्या विधानसभेचा कोणताही अनुभव नसताना थेट नगरसेवक स्तरावरून केंद्रीय मंत्रिपरिषदेत जाण्याचा दुर्मिळ मान मिळवला आहे.

पुण्यातील कोणकोणत्या खासदारांना यापूर्वी केंद्रात मंत्रीपद मिळालंय?
यासह पुणे लोकसभा मतदारसंघाला तब्बल तीन दशकांनंतर केंद्रीय मंत्रालयात प्रतिनिधित्व मिळाले आहे. सर्वप्रथम पुण्याचे खासदार असलेले आणि काँग्रेस आणि जनता पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे मोहन धारिया यांनी 1970 च्या दशकात नियोजन राज्यमंत्री, बांधकाम आणि गृहनिर्माण राज्यमंत्री आणि वाणिज्य, नागरी पुरवठा आणि सहकार मंत्री म्हणून काम केले होते.

त्यांच्यानंतर 1980 ते 1989 या काळात काँग्रेसचे विठ्ठलराव गाडगीळ यांनी पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली माहिती आणि प्रसारण यासारखी खाती सांभाळली होती. त्यांचे वडील नरहर विष्णू गाडगीळ, ज्यांना काकासाहेब गाडगीळ म्हणूनही ओळखले जाते, ते पुण्यातील पहिले केंद्रीय मंत्री होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाखाली 1947 मध्ये ते देशाच्या पहिल्या मंत्रिमंडळात ऊर्जा मंत्री होते. काकासाहेब पुढे पंजाबचे राज्यपाल झाले.

पुढे पीव्ही नरसिंह राव यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात काँग्रेसचे सुरेश कलमाडी यांनी 1995 ते 1996 या काळात रेल्वे राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. त्याच वर्षी त्यांनी रेल्वे अर्थसंकल्प सादर केला होता. नंतर भाजपचे राज्यसभा सदस्य प्रकाश जावडेकर हे मोदींच्या पहिल्या दोन कार्यकाळात मंत्री होते. त्यांनी 2014 ते 2016 आणि 2019 ते 2021 पर्यंत पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री म्हणून काम केले. ते संसदीय कामकाज राज्यमंत्री देखील होते आणि त्यांच्याकडे माहिती आणि प्रसारण खात्याचा कार्यभार होता. भाजपचे पुणे लोकसभा खासदार अनिल शिरोळे (2014) आणि दिवंगत गिरीश बापट (2019) यांना मंत्रीपद मिळू शकले नाही. मात्र आता मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रात मंत्रीपद मिळवण्याचा कारनामा केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा घेतली शपथ, राष्ट्रपती भवनात पार पडला सोहळा

Modi’s Cabinet : महाराष्ट्रातील 6 खासदारांना मंत्रिपदासाठी फोन; जाणून घ्या कुणाला मिळणार संधी?

Murlidhar Mohol : नगरसेवक, महापौर ते थेट केंद्रात मंत्री! मुरलीधर मोहोळांना लॉटरी!