मुस्लिम लोकं 40-40 मुलं जन्माला घालत आहेत, हिंदूंनी 4-5 मूलं तरी जन्माला घालावीत – ठाकूर 

Devakinandan Thakur – भागवत कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांनी मोठे विधान केले आहे. मुस्लिम लोकं 40-40 मुलं जन्माला घालत आहेत. तर हिंदूंनी 4-5 मूलं तरी जन्माला घालावीत. मला स्वत:ला चार मुलं आहेत, असं म्हणत देवकीनंदन यांनी सनातनींना जेवढी जमतील तेवढी मुलं जन्माला घाला, असा सल्ला दिल्याने खळबळ उडाली आहे.

भोपाळमध्ये बोलताना ते म्हणाले, अल्पसंख्याक हे 40-40 मुलं जन्माला घालू शकतात. मग आपण हिंदू 4-5 मुलं जन्माला घालू शकत नाहीत का ?  माझी स्वत:ची 4 मुलं आहेत. त्यामुळे मी हिंदूंना 5-5 मुलं जन्माला घालण्याचे बोलत आहे, असेही देवकीनंदन म्हणाले. जोपर्यंत लोकसंख्या नियंत्रण कायदा होत नाही, तोपर्यंत बहुसंख्य राहाल असे कार्य करा. सनातनी हेच बहुसंख्य असायला हवेत, अन्यथा हा देश सेक्युलर राहणार नाही, असेही देवकीनंदन यावेळी म्हणाले.

देवकीनंदन म्हणतात की, आम्ही 60 कोटी झाल्यानंतर हा देश आमचा होईल, आत्ता ते 30 कोटी आहेत, तरीही तशी भाषा करतात. युट्यूबवर याबाबतचे व्हिडीओ व्हायरल झालेले पाहायला मिळतील. हे आत्ताच असं बोलत असतील, मग पुढे काय होईल, असा प्रतिप्रश्नच देवकीनंदर महाराज यांनी एका प्रसारमाध्यमाशी बोलताना विचारला.