छगन भुजबळ यांच्या हस्ते १८०० मेट्रिकटन गोदाम व येवला उपविभागीय अधिकारी व तहसीलदार निवासस्थानाचे उद्घाटन

येवल :-. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या हस्ते आज अंगणगाव येथे १८०० मेट्रिक टन साठवण क्षमेतेचे गोदाम व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार निवास स्थानाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच येवला तालुक्यातील ६ मंडळ अधिकारी व ३ तलाठी कार्यालय व निवस्थान बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी तहसीलदार आबा महाजन, मुख्याधिकारी नागेंद्र मुत्केकर, उपविभागीय अभियंता अभिजीत शेलार, सागर चौधरी, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, माजी जिल्हा परिषद सभापती संजय बनकर, शहराध्यक्ष दिपक लोणारी, नवनाथ काळे, बाळासाहेब गुंड, सुनील पैठणकर, संतोष खैरनार, भाऊसाहेब धनवटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.