“सनातन धर्म माझं सर्वस्व पण आफ्रिदीने मला त्रास देऊन..”, माजी खेळाडू दानिश कनेरियाची संतप्त टीका

Danish Kaneria Religion Conversion: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (पीसीबी) अनेक गंभीर आरोप केले आहेत. पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने पीसीबीवर (PCB) आरोप करत म्हटले की, ही मैत्रीवर बांधलेली टीम आहे. माझ्या टीममधील एकाही सदस्याने मला पाठिंबा दिला नाही, असा आरोपही त्याने केला. यासोबतच त्याने ड्रेसिंग रुमच्या संस्कृतीबद्दलही सांगितले. त्याला नमाजसंदर्भात फोन यायचे, असा खळबळजनक खुलासा त्याने केला आहे.

आज तक या टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत दानिश कानेरिया म्हणाला, “भारतातही खेळाडू पूजा करतात, विराट कोहली-रोहित शर्माही पूजा करतात. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज देखील नमाज अदा करू शकतात, परंतु त्यांनी कधीही पाकिस्तानी क्रिकेटपटूंसारखा दिखावा नाही केला. आपण त्यांना कधीही मैदानावर नमाज अदा करताना पाहिले नाही.”

याशिवाय दानिश कनेरिया जय श्री रामच्या घोषणेबद्दल म्हणाला, “त्यांचे प्रशिक्षक म्हणतात की दिल-दिल पाकिस्तानचा नारा वाजवला नाही, जय श्री रामचा नारा वाजवला गेला. सगळ्यात आधी मी त्यांना सांगतो की, जय श्री रामचा जयघोष भारतात स्वागतासाठी वापरला जातो. असे नारेबाजी करत भारतीय चाहते एकप्रकारे तुमचे स्वागत करत होते.”

मी हिंदू समाजासाठी आवाज उठवीन
दानिश कानेरिया पुढे म्हणाले, “पाकिस्तानात जे काही चालले आहे, त्याची माहितीही दिलेली नाही, मी त्याविरोधात आवाज उठवणार आहे. मी सनातनी आहे आणि हिंदू समाजासाठी आवाज उठवणार आहे. भारतातील प्रत्येक व्यक्तीने आणि माध्यमांनी हा आवाज उठवावा असे मला वाटते.”

इंझमाम आणि शोएब अख्तर यांनी खूप साथ दिली
यासोबत दानिश म्हणाला – “देवाच्या कृपेने माझे करिअर चांगले चालले होते, इंझमाम उल-हक आणि शोएब अख्तर यांनी मला खूप सपोर्ट केला आहे. मात्र, शाहिद आफ्रिदीने (shahid afridi) मला खूप त्रास दिला. त्याने माझ्यासोबत जेवण केले नाही. इतकेच नाही तर तो सातत्याने मला धर्म परिवर्तनाबद्दल बोलत असायचा. पण माझा धर्मच माझ्यासाठी सर्वस्व आहे.”

मी कट्टर सनातनी आहे
दानिश कनेरिया म्हणाला की, “जर मी धर्मांतर केले असते तर आज माझी ही स्थिती झाली नसती. मी पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार झालो असतो. मी कट्टर सनातनी आहे. मला सनातन धर्म खूप आवडतो. माझ्यासाठी माझा धर्मच सर्वस्व आहे. मला कदाचित रोजगार मिळणार नाही, मला काही मिळणार नाही, माझ्याकडे धर्म असेल तर ते सर्व काही आहे. मला अनेक वेळा धर्मांतर करण्यास सांगितले होते. मी त्यांना जय श्री राम म्हणालो.”

महत्वाच्या बातम्या-

ऑस्ट्रेलियाच्या झंझावाती विजयाने पाकिस्तान विश्वचषकातून बाहेर जाण्याच्या मार्गावर ?

धक्कादायक ! ललित पाटीलला पुण्याबाहेर पळवण्यात ‘या’ व्यक्तीचा होता हात

इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी भारतासाठी चिंता वाढवणारी बातमी, हार्दिकच्या फिटनेसबद्दल मोठी अपडेट