ऑस्ट्रेलियाच्या झंझावाती विजयाने पाकिस्तान विश्वचषकातून बाहेर जाण्याच्या मार्गावर ?

victory of Australia : विश्वचषक २०२३ मध्ये आज ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर एकतर्फी सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 399 धावा ठोकल्या. त्यामुळे 400 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या नेदरलँड संघाला पूर्ण 50 षटकेही खेळता आली नाहीत.

नेदरलँड्स संघ केवळ 21 षटकांपर्यंतच ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचा सामना करू शकला. नेदरलँडचा संघ २१ षटकांत केवळ ९० धावा करू शकला. ऑस्ट्रेलियाने हा सामना 309 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. विश्वचषकातील पहिले दोन सामने गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ आता जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. कारण, संघाने हा सलग तिसरा विजय मिळवून गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर कब्जा केला आहे.

5 वेळा विश्वचषक चॅम्पियन ऑस्ट्रेलिया संघाला पहिल्या दोन सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दारूण पराभव पत्करावा लागला होता, त्यानंतर संघावर जोरदार टीका होत होती. मात्र आता ऑस्ट्रेलियन संघाने विश्वचषकात दमदार पुनरागमन केले असून सलग 3 सामने जिंकून उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा बळकट केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाला आणखी 4 सामने खेळायचे आहेत, जर संघाने तीन सामनेही जिंकले तर संघ सहज उपांत्य फेरीत प्रवेश करेल.

2023 च्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. कारण, अफगाणिस्तानविरुद्धच्या दणदणीत पराभवानंतर पाकिस्तानचे बरेच नुकसान झाले असून पाच सामन्यांत केवळ दोन विजयांसह हा संघ आता गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. आता मात्र पाकिस्तान या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. पण सध्या पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्याची काही शक्यता आहे.

2023 च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची आतापर्यंतची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. या विश्वचषकात भारत हा एकमेव संघ आहे ज्याने आतापर्यंत एकाही पराभवाचा सामना केलेला नाही. टीम इंडिया 5 मॅचमध्ये 5 विजय मिळवून पॉइंट टेबलवर पहिल्या स्थानावर आहे आणि 10 पॉईंट्स जमा केले आहेत. आता संघाला लखनौच्या मैदानावर २९ ऑक्टोबरला इंग्लंडविरुद्ध सहावा सामना खेळायचा आहे. टीम इंडियाने हा सामना जिंकल्यास सेमीफायनलमध्ये आपले स्थान जवळपास निश्चित होईल.

महत्वाच्या बातम्या-

‘उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातील तरुणांपेक्षा स्वतःच्या मुलाच्या भविष्याची चिंता’

दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाला क्लिन बोल्ड केल्यानंतर शोरिफुलचे हृतिक स्टाईल सेलिब्रेशन, Video Viral

तुमची खोक्याची लंका दहन करण्यासाठी ‘मशाल’ माझ्याकडे आहे; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल