धक्कादायक ! ललित पाटीलला पुण्याबाहेर पळवण्यात ‘या’ व्यक्तीचा होता हात

पुणे : ड्रग्ज तस्कर ललित पाटील (Lalit Patil) याला ससून रुग्णालयामधून (Sasoon Hospital) मधून पळून जाण्यासाठी मदत केल्याच्या (drug) आरोपाखाली पुण्यातील रोझरी स्कूलचा संचालक विनय अर्हाना याला पुणे पोलिसांच्या गुन्हे (Crime News) शाखेने अटक केली आहे. त्याला या संदर्भात ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे. यापूर्वीच त्याच्या ड्रायव्हरला पुणे पोलिसांनी अटक (Arrested) केलेली होती. अत्यंत हाय प्रोफाईल बनलेल्या या प्रकरणामध्ये विनय अर्हाना याने ललित पाटीला याला पळून जाण्यासाठी मदत केल्याचे समोर आले आहे. (Pune News).

मिळालेल्या माहितीनुसार, ड्रग माफिया ललित पाटील पुण्यातील ससुन रुग्णालयातील (Sasoon Hospital Drug Racket) कैद्यांसाठीच्या 16 नंबर वॉर्डमधे उपचारांच्या नावाखाली बंद होता. याच ठिकाणी विनय अरहाना याच्यावर एका सहकारी बँकेची 46 कोटी रुपयांची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल आहे. तोही याच 16 नंबर वॉर्डमध्ये उपचारांच्या नावाखाली बंद होता. दोघांची 16 नंबर वॉर्डमधे एकमेकांशी ओळख झाली होती आणि त्यातुन विनय अरहानाने ललित पाटीलला पळून जाण्यास मदत केली.

ललित पाटील ससुन रुग्णालयातून 2 ऑक्टोबरला निसटल्यानंतर आधी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गेला आणि तिथून सोमवार पेठेत पोहचला. तिथे विनय अरहाना याचा ड्रायव्हर दत्ता डोके हा कार घेऊन तयार होता. दत्ता डोकेने ललित पाटीलला पुण्याच्या बाहेर रावेतपर्यंत सोडले आणि स्वतः जवळचे दहा हजार रुपये देखील ललितला दिले. हे सगळे त्याने विनय अरहानाच्या सांगण्यावरून केले.

https://www.youtube.com/watch?v=52bkac9xyp8&t=18s

महत्वाच्या बातम्या-

साप माणसाला चावला तर माणूस मरेल, पण स्वतःला चावला तर काय होईल?

Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी ‘राष्ट्रीय तालीम संघाची’ निवड चाचणी रविवारी

राज्यातील आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडू व मार्गदर्शकांच्या पारितोषिक रक्कमेत दहापट वाढ