पवार कुटुंबाचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे; नाना पटोले यांचा हल्लाबोल

मुंबई – महाविकास आघाडीत सत्तेचा उपभोग घेणारे कॉंग्रेस(congress) आणि राष्ट्रवादी(ncp) हे एकमेकांवर चिखलफेक करत असल्याचे दिसून येत आहे. यातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राष्ट्रवादी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर (Sharad Pawar and Ajit Pawar) यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

राष्ट्रवादीचा भाजपसोबत मिळून काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न आहे. तर पवार कुटुंबाचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. राष्ट्रवादीचं भाजपशी साटंलोटं असून काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न आहे, अशा शब्दात नाना पटोलेंनी हल्लाबोल केला आहे. उदयपूरमध्ये(udaypur) काँग्रेसचं नवसंकल्प शिबिर सुरु आहे. याठिकाणी एबीपी माझाशी(abp majha) बोलताना पटोले यांनी हे गंभीर आरोप केले आहेत.

पवार कुटुंबाचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर काही बोलणार नाही. त्यांचे पाप लपविण्यासाठी त्यांच्याकडून काँग्रेसवर आरोप करण्यात येत आहे. मी कुणावर टीका करणार नाही, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. 2010 पासूनची यादी राष्ट्रवादी काँग्रेसकडून वाचून दाखवण्यात आली असती तरी ती केवळ राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांच्यामुळेच असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. ज्या लोकांचा ते उल्लेख करताय ती लोक आज भाजपमध्ये आहेत. म्हणून राष्ट्रवादीकडून दाखवण्यात येणारी यादी म्हणजे आपले पाप लपविण्यासाठी केलेला एक अयशस्वी प्रयत्न आहे, असंही पटोले म्हणाले.