Muralidhar Mohol | नरेंद्र मोदींची प्रधानमंत्री पदाची शपथ, मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात मंत्रीपद! कसबा मतदारसंघात आनंदोत्सव

पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा शपथ घेतली. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांची देखील केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. या निमित्ताने कसबा विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रमुख हेमंत रासने  (Hemant Rasane) यांच्या नेतृत्वात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची उधळण आणि पेढे वाटत भाजपा कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला.

यावेळी बोलताना हेमंत रासने म्हणाले, “देशाच्या अमृत महोत्सवाच्या नंतर भारताची शताब्दीच्या दिशेने वाटचाल चालू असताना सलग तिसऱ्यांदा या देशाचे विकासपुरुष, ज्यांनी अतिशय गतिमान पद्धतीने मागील दहा वर्षात विकास करणारे नरेंद्र मोदी यांची सलग तिसऱ्यांदा हे पंतप्रधानपदी निवड झालेली आहे. 140 कोटीच्या या जनतेने एकदा सलग तिसऱ्यांदा मोदीजी यांच्यावर विश्वास ठेवला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या पाच वर्षांमध्ये भारत जगातील तिसरी महासत्ता होणार यावर सर्वांचा विश्वास आहे. यामध्ये पुणेकरांच्या अभिमानाची गोष्ट म्हणजे पुण्याचे वैभव असणारे खासदार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांची सुद्धा केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने आमचा आनंद द्विगुणित झाला आहे. देशाच्या विकासात मुरली अण्णांची सुद्धा भूमिका आता महत्त्वाची ठरणार आहे”.

यावेळी कसबा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे यांच्यासह मा. नगरसेवक मनीषाताई लडकत, धनंजय जाधव, सरचिटणीस प्रणव गंजीवाले, चंद्रकांत पोटे, उमेश चव्हाण, वैशाली नाईक, निलेश कदम, जयसिंग राजपूत, महिला मोर्चा अध्यक्ष अश्विनी पवार, युवा मोर्चा अध्यक्ष निर्मल हरिहर, सर्व माजी नगरसेवक, महिला आघाडी, युवा मोर्चा पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा घेतली शपथ, राष्ट्रपती भवनात पार पडला सोहळा

Modi’s Cabinet : महाराष्ट्रातील 6 खासदारांना मंत्रिपदासाठी फोन; जाणून घ्या कुणाला मिळणार संधी?

Murlidhar Mohol : नगरसेवक, महापौर ते थेट केंद्रात मंत्री! मुरलीधर मोहोळांना लॉटरी!