Farmer Agitation | जिल्ह्यातील बाजार समित्या कडकडीत बंद; स्वाभिमानीच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद

Farmer Agitation – कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका न घेता कायमस्वरुपी प्रशासकाची नेमणूक करण्याचा निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी (दि.26) पुकारलेल्या बंद आंदोलनाला बाजार समित्या बंद ठेवून व्यापारी, शेतकरी, हमाल मापाडी बांधवांनी मोठा प्रतिसाद दिला.

या आंदोलनात जिल्ह्यातील धाराशिव, तुळजापूर, उमरगा, मुरुम, लोहारा, परंडा, भूम, कळंब, वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकार्‍यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. केंद्र सरकारने बाजार समितीच्या धोरणात बदल करून निवडणुका न घेता कायमस्वपरूपी प्रशासकाची नेमणूक करून कारभार चालविण्याचा निर्णय हा देशातील शेतकर्‍यांच्या अधिकारावर गदा आणणारा असल्यामुळे केंद्र सरकारने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन (Farmer Agitation) करण्यात आले. या आंदोलनाला व्यापारी, हमाल माथाडी कामगार, शेतकर्‍यांचा मोठा प्रतिसाद लाभल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी दिली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

‘एकच मिशन, पुणे नंबर वन’ हा संकल्प घेऊन पुण्यासाठी कार्यरत राहणार – Shivaji Mankar

जास्तीत जास्त युवक-युवतींना मेळाव्यातून रोजगार मिळण्यासाठी रोजगार इच्छूकांची नोंदणी वाढवावी, उपमुख्यमंत्री पवारांचे आवाहन

जनतेला लिहिलेल्या खुल्या पत्रात पवार साहेबांचं नाव लिहिण्याचे धाडस दादांमध्ये नाही