Pimpri Chinchwad | चिंचवड मध्ये एकाचा खून; कारण जाणून घेतल्यास तुम्हालाही बसेल धक्का

Pimpri Chinchwad Crime News : पैशांच्या दिवाण-घेवाणीच्या कारणावरून एका व्यक्तीवर शस्त्राने वार करत त्याचा खून करण्यात आला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी नागसेननगर झोपडपट्टी, चिंचवड येथे घडली.

प्रकाश मारुती म्हेत्रे (वय 40) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. प्रकाश आणि कमलेश किशोर यांच्यामध्ये पैशांच्या देवाणघेवाणीवरून सोमवारी सायंकाळी वाद झाला. त्या कारणावरून कमलेश किशोर याने प्रकाश यांच्या मांडीवर हत्याराने वार केले. त्यामध्ये प्रकाश गंभीर जखमी झाले.

यानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी पिंपरी (Pimpri Chinchwad) येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलिसांनी कमलेशकिशोर रमेश भट (वय 40) याला ताब्यात घेतले आहे.

महत्वाच्या बातम्या-

ऐतिहासिक! रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारताचा इंग्लंडवर सर्वात मोठा विजय, ४३४ धावांनी जिंकली कसोटी

Sunetra Pawar | सुप्रिया सुळे यांच्यासमोर आव्हान निर्माण करणाऱ्या सुनेत्रा पवार नेमक्या कोण आहेत?

Ambernath | धक्कादायक ! चोरीच्या संशयातून दोन तरुणांना जमावानं बेदम मारहाण करून संपवलं