Congress | भाजप कॉंग्रेसला पुन्हा एकदा धक्का देण्याच्या तयारीत; मातब्बर नेता भाजपमध्ये प्रवेश करणार ?

Congress : लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2024) जसजशी जवळ येत आहेत तशी कॉंग्रेसमधून गळती सुरु झाली आहे. महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मध्य प्रदेशात माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamalnath) भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु असताना आता आणखी एक कॉंग्रेसचा बडा नेता भाजपच्या वाटेवर आहे अशी माहिती समोर येत आहे.

काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम (Sanjay Nirupam) भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. निरुपम अनेक दिवसांपासून काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्यात ते आता भाजपत प्रवेश करणार असल्याचं सुत्रांकडून समजतंय. मुंबईत भाजपकडून काँग्रेसला पुन्हा एकदा धक्का देण्याचा हा प्रयत्न मानला जातोय.

दरम्यान, तिकडे झारखंडच्या राजकारणात पुन्हा वादळ घोंघावत असल्याची माहिती मिळत आहे. झारखंड सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्याने काँग्रेसच्या (Congress) काही आमदारांमध्ये प्रचंड नाराजी असल्याची माहिती मिळत आहे. या नाराज आमदारांची संख्या 12 आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आलमगीर आलम, रामेश्वर उराँव, बन्ना गुप्ता आणि बादल पत्रलेख यांना पुन्हा मंत्रीपद देण्यात आल्याने काँग्रेस आमदारांचा एक मोठा गट नाराज असल्याची माहिती मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या-

Jayant Patil भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

भाजपसोबत युती करणार का?; आशिष शेलार यांच्या भेटीनंतर राज ठाकरे काय म्हणाले?

मनसे भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीसह जाणार? आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, तासभर चर्चा