“पोलीस आमच्या राज्यात आमचे काय बिघडवणार?” भाजपा आमदार Nitesh Rane यांचे वादग्रस्त विधान

भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे टीकेचे धनी ठरत असतात. नुकतेच त्यांनी पोलिसांबाबत असे वक्तव्य केले आहे, ज्यामुळे त्यांच्या विरोधात टीकेची झोड उटली आहे.

अकोल्यात रविवारी रात्री आयोजित कार्यक्रमात बोलताना नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, “माझे कोणी काहीही करू शकत नाही. पोलिसांना भाषणाचे चित्रीकरण करू द्या. ते काहीही करू शकत नाहीत. भाषणाचे चित्रीकरण केवळ बायकोला दाखवतील. आमच्या राज्यात आमच्यावर काही करू शकणार? त्यांना जागेवर राहायचे आहे की नाही? पोलीस माझे काहीही बिघडवू शकत नाहीत.”

सर्वत्र अतिक्रमण केले जात आहे. राजरोसपणे हिंदू समाजाच्या कुटुंबांना त्यांच्या हक्काच्या घरातून बळजबरीने बाहेर काढण्याचे काम सुरू आहे, असा आरोप देखील नितेश राणे यांनी केला. हिंदू समाजावर होणारे आक्रमण रोखण्यासाठी प्रत्येक हिंदूंनी आवाज उचलला पाहिजे, असे आवाहन देखील त्यांनी केले. दरम्यान, नितेश राणेंच्या विधानावरून आता चौफेर टीका होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

Jayant Patil भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

भाजपसोबत युती करणार का?; आशिष शेलार यांच्या भेटीनंतर राज ठाकरे काय म्हणाले?

मनसे भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीसह जाणार? आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, तासभर चर्चा