Breaking : नवाब मलिक यांना ईडीकडून अटक

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नवाब मलिक यांनी ईडी कार्यालयात नेण्यात आले. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी केल्याप्रकरणात ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू आहे. राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडीने समन्स पाठवले होते. पहाटे पाच वाजता ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी दाखल झाले होते. त्यानंतर नवाब मलिक स्वतः ईडीच्या कार्यालयात गेले आहेत.

मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती.

तब्ब्ल ८ तास कसून चौकशी केल्यानंतर नवाब मलिक यांच्यावर ईडी कडून अटकेची कारवाई करण्यात आली आहे. नवाब मलिक ईडी कार्यलयाबाहेर आले. त्यानंतर बाहेर पडताच विजयाची खूण त्यांनी केली आहे आणि झुकेंगे नहि अशी प्रतिक्रिया दिली आहे. अटकेनंतर नवाब मलिक यांना वैद्यकीय तपासणीसाठी जे.जे रुग्णालयात ईडीचे अधिकारी घेऊन गेले आहेत.