रावसाहेब दानवे यांनी केला मनमाड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या विशेष ट्रेनचा शुभारंभ

भोकरदन – भारत सरकारच्या रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे ( Raosaheb Patil Danve ) यांचे शुभहस्ते ‘मनमाड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई’ (‘Manmad – Chhatrapati Shivaji Maharaj Terminus, Mumbai’ ) विशेष ट्रेन सेवेचा शुभारंभ करण्यात आला. भोकरदन येथून व्हिडीओ कॉन्फरंसिंग द्वारे हिरवा झेडा दाखवून मनमाड स्टेशन येथून मनमाड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष ट्रेन सोडण्यात आली.

यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री खा.डॉ. भारती पवार, मनमाड नगरपालिकेच्या अध्यक्षा पद्मावती धात्रक, आमदार सुहासजी कांदे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, भुसावळचे रेल्वे व्यवस्थापक आणि संबंधित रेल्वे अधिकारी, कर्मचारी आणि प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रेल्वे मंत्रालयाच्या मध्य रेल्वे विभागाकडून सुरु करण्यात आलेल्या या सेवेमुळे मुंबई-नाशिक-मनमाड विभागा अंतर्गत उत्तम कनेक्टिव्हिटी प्रस्थापित होणार आहे. या ट्रेनचा उपयोग लासलगाव, निफाड, नाशिक रोड, इगतपुरी, इत्यादी स्थानकांवरील नागरिकांना होणार आहे. शेतकऱ्यांना, कामगारांना, नोकरदारांना, व्यावसायिकांना तसेच येथील विद्यार्थ्यांना या सेवेचा फायदा होणार आहे.