आम्ही लोकांसाठी, त्यांच्या विकासासाठी सत्तेत सहभागी – छगन भुजबळ

Chhagan Bhujbal: आम्ही सत्तेत आलो तर सत्तेत का गेलात असे काहीजण विचारत आहेत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी मला सत्तेची हाव नाही असे सांगितले होते त्यांच्या विचारांचा प्रभाव घेत आम्ही लोकांसाठी, त्यांच्या विकासासाठी सत्तेत सहभागी झाल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर सभेत स्पष्ट केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सत्तेत जाऊन मंत्री झाले नसते तर आजचे संविधान दिले असते का? त्यांनी सत्तेत जाऊन आपल्या समाजाला पुढे आणण्याचे काम केले असेही छगन भुजबळ म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) भारताचा ठसा जी -२० मध्ये उमटवत भारत विकासात पुढे जात आहे हे जगाला दाखवून दिले त्यामुळे त्यांचे सर्वांनी कौतुक केले असेही छगन भुजबळ यांनी सांगितले.

ओबीसींसाठी प्रत्येक जिल्ह्यात मुलींचे वसतीगृह बांधले जाणार आहे. विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण करण्यासाठी सवलती दिल्या जात आहेत याची माहितीही सभेत देतानाच गोरगरीबांसाठी जे जे करता येईल ते ते आम्ही करणार आहोत अशी ग्वाही छगन भुजबळ यांनी दिली.

सभेत माजी आमदार के. पी. पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आमदार राजेश पाटील यांनी आपले विचार मांडले.

उत्तरदायित्व सभेला येण्याअगोदर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांचे पुण्यापासून जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर कोल्हापूरच्या महाराणी ताराराणी चौकात अजितदादा पवार यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर दोन हजार मोटारसायकल रॅलीने सभास्थळी अजितदादा पवार आणि नेत्यांचे आगमन झाले.

बीडच्या जाहीर सभेनंतर आज राष्ट्रवादीची दुसरी ‘उत्तरदायित्व सभा’ कोल्हापूरातील सर्वांत मोठ्या तपोवन मैदानावर विराट अशा प्रतिसादात पार पडली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री धनंजय मुंडे, युवा नेते पार्थ पवार, युवा नेते नावेद मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, आमदार विक्रम काळे, आमदार मकरंद पाटील, आमदार मानसिंग गायकवाड, माजी आमदार के. पी. पाटील, ज्येष्ठ नेते अण्णा डांगे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, महिलाध्यक्षा शितलताई फरादपे, युवक शहराध्यक्ष आदील फरास आदींसह कोल्हापूर जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

SBI Recruitment 2023: स्टेट बँकेत नोकरी करण्याची संधी, पगार 47,900 रुपयांपर्यंत असणार

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख; अवघ्या १४ महिन्यात १३,००० हुन अधिक रुग्णांना ११२ कोटी १२ लाखांची मदत वितरित