राणेंना एका बाईनं पाडलं, अजित पवारांची नारायण राणेंवर घणाघाती टीका

पुणे : चिंचवड (Chinchwad) आणि कसबा पेठ (Kasba Peth) पोटनिवडणुकीचा प्रचार आज अंतिम टप्प्यात आला आहे.  उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी काही शिल्लक तास बाकी राहिले आहेत. त्यामुळे कसबा आणि चिंचवडमध्ये राजकीय नेत्यांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. यातच काल चिंचवडमध्ये अजित पवारांनी (Ajit Pawar) नाना काटे (Nana Kate) यांच्या सभेत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर जोरदार फटकेबाजी केली. तोच व्हिडीओ खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) ट्विट करत जोरदार निशाणा साधला.

अजित पवारांची काल चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांची प्रचार सभा पार पडली. त्या सभेत अजित पवार यांनी शिवसेनेच्या बंडाळीवरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना निशाण्यावर धरलं. नारायण राणे यांनी शिवसेना फोडली. सर्व पडले की नाही? राणे साहेब तर दोनदा पडले. एकदा कोकणात पडले. दुसऱ्यांदा वांद्रे की कुठे तरी पडले. हा. तिथे पडले. तिथे तर महिलेने पाडलं. बाईनं पाडलं. बाईंन. ही त्यांची प्रत्येकाच काय परिस्थिती आहे. असा टोला अजित पवारांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर लगावला.