अजितदादांनी कॉंग्रेस आणि ठाकरेंच्या चिंता वाढवणारे केलं वक्तव्य; महाविकास आघाडीला तडा जाण्याची शक्यता 

NCP : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (State Opposition Leader Ajit Pawar) यांनी महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच मोठा भाऊ आहे असं सूचक वक्तव्य केलं आहे. अजून महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. तरीही कोल्हापूरमध्ये बोलत असताना अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

अजित पवार म्हणाले, आपण महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहोत. आघाडी आपल्याला मजबूत ठेवायची आहे. पण हे करत असताना लक्षात ठेवा की तुमची ताकद जास्त असेल तरच तु्म्हाला महाविकास आघाडीत महत्त्व दिलं जाईल. याआधीच्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसच्या जागा जास्त असायच्या. जागा वाटप करताना आपल्याला लहान भाऊ म्हणून भूमिका घ्यावी लागायची. पण आता आपण काँग्रेसपेक्षा मोठे भाऊ झालो आहोत. कारण त्यांच्या ४४ जागा आहेत आणि ५४ जागा आहेत. उद्धव ठाकरेंकडे ५६ आमदार होते. हे गणित आहे.” असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे.

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरायचा आहे. मात्र त्याआधीच आम्ही मोठा भाऊ आहोत असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अजित पवारांनी सांगितलं आहे. राजकीय वर्तुळात या वक्तव्याची चर्चा होऊ लागली आहे.