Rohini Khadse : ‘चुम्मा चुम्मा’ पुरस्काराचे मानकरी कोण?; खडसेंनी काढली म्हात्रेंची लायकी

Rohini Khadse: देशातील शंभर कर्तृत्ववान महिलांच्या यादीत खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांचा समावेश झाला आहे. त्यावरून शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी सुळेंवर बोचरी टीका केली होती. ‘10 एकरात 110 कोटींची वांगी… हा तर चक्क कृषीक्षेत्रातला वैज्ञानिक शोध… वांगीसम्राज्ञी नामक एक पुरस्कारही लवकरच दिला पाहिजे’, असे शीतल म्हात्रे खवचटपणे बोलल्या होत्या. आता यावर प्रत्युत्तर देताना महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी म्हात्रेंची लायकी काढली आहे.

महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाचा वारसा आहे. मात्र गेले काही दिवस झाले शीतल म्हात्रे यांनी गायपट्ट्याची संस्कृती अंगिकारल्याची झलकच दाखवून दिली आहे. आदरणीय सुप्रिया ताई बद्दल बोलताना त्यांना महिला दिसत नाही परंतु स्वतःवर आले की त्यांना महिला सबलीकरण आठवते. शितल म्हात्रे तुमची लायकी नाही हो सुप्रिया ताई सुळे यांच्या वर टिका करायची. तुम्ही स्वकर्तुत्वाने आमदार होऊन दाखवा आधी.

त्यांना संसदरत्न, संसद महारत्न असे पुरस्कार त्यांनी केलेल्या कामामुळे मिळाले आहेत. राहिला प्रश्न वांग्याचा तर स्वतःच्या मध्ये हिंमत असेल तर कोर्टात जा , RTI टाका माहिती घ्या नंतर आपले पिसाळे तोंड उघडा. चौकशी लागेलं म्हणून स्व पक्षासोबत गद्दारी केलेल्या म्हात्रे बाईने सुप्रिया ताई सुळे यांच्या वर बोलणे म्हणजे शिंदळ बाईने सावित्रीवर चिखल उडवण्यासारखे आहे. शीतल म्हात्रे आपलं चिचुंद्री सारखे तोंड बंद ठेव. आदरणीय सुप्रिया ताईवर टिका करताना भाषेचे भान असू द्या, नाहीतर त्याच भाषेत उत्तर दिले जाईल..! चुम्मा चुम्मा पुरस्काराचे मानकरी कोण आहे हे सबंध महाराष्ट्राला माहीत आहे, त्यामुळे आपल्या लायकी नुसार वागा..!, अशा तिखट शब्दांत खडसेंनी म्हात्रेंचा समाचार घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘शेतकऱ्यांचं कंबरडे मोडण्याच पाप हे केंद्र सरकारने आणि ट्रिपल इंजिनच्या सरकारने केलेले आहे’

आमचं सरकार आल्यावर सरसकट कर्जमाफी होईल; खासदार सुप्रिया सुळे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

‘देवेंद्र फडणवीस केवळ आकडेवारी फेकतात, पण सत्य परिस्थिती ते जनतेपासून लपवतात’