पवारसाहेबांचे नाव वापरून सदाभाऊ खोत स्वतः च्या प्रसिद्धीला खतपाणी घालत आहेत – राष्ट्रवादी

मुंबई – या राज्यामध्ये जातीयवादाला खतपाणी ( Fertilizer for racism ) हे खऱ्या अर्थाने पवारसाहेबांनी ( Pawar ) घातलेलं आहे. म्हणून त्यांनी त्यांच्या पक्षात प्रत्येक जातीचा नेता तयार केला आहे अशी घणाघाती टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत (Former Minister Sadabhau Khot)  यांनी सांगलीत बोलताना केली आहे. जातीभेद वाढवा, जातीजातीत तणाव निर्माण करा. वेगवेगळ्या समाजामध्ये दुही निर्माण करुन त्यांना फोडा, झोडा ही राष्ट्रवादीची निती जुनी आहे असं ते म्हणाले.

ज्याने त्याने आपापली जात सांभाळायची, त्याच्या बदल्यात कितीही भ्रष्टाचार ( Corruption ) करायचा. तुम्हाला आमदार करतो, खासदार करतो, मंत्री करतो पण त्याच्या बदल्यात तुम्ही तुमची जात सांभाळा.. आणि पवारसाहेब कसे तारणहार आहेत, एवढंच त्या जातीमध्ये जाऊन सांगा… गेली ४० वर्ष या महाराष्ट्रात हाच धंदा सुरु आहे. पण आता महाराष्ट्राच्या जनतेला सारं काही कळायला लागलं आहे असं सदाभाऊ खोत म्हणाले.

पवारसाहेबांचे नाव वापरून सदाभाऊ खोत स्वतः च्या प्रसिद्धीला खतपाणी घालत आहेत असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी लगावला आहे. सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर जातीयवादाचा आरोप केल्यानंतर क्लाईड क्रास्टो यांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. आदरणीय पवारसाहेबांचे नाव घेऊन फुकट प्रसिद्धी मिळविणाऱ्यांच्या सूचीमध्ये आणखी एक नाव जोडले गेले असे ट्वीट करत क्लाईड क्रास्टो यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली आहे.