रविश कुमार च्या राजीनाम्याने आज डावे आणि तथाकथित पुरोगामी ‘विधवा’ झाले ! – भोसले

Mumbai – वरिष्ठ पत्रकार रविश कुमार यांनी अखेर NDTV इंडिया या वृत्तवाहिनीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपल्या वरिष्ठ कार्यकारी संपादकपदाचा राजीनामा दिला आहे. (Ravish Kumar resigns from NDTV) कंपनीनं देखील त्यांचा राजीनामा स्विकारला असून तो तात्काळ प्रभावानं लागू होईल असं सांगितलं आहे.

दरम्यान, रविश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर आता अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. याबाबत भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. रविश कुमार च्या राजीनाम्याने आज डावे आणि तथाकथित पुरोगामी ‘विधवा’ झाले !असं भोसले यांनी म्हटले आहे.

रविश कुमार हे अनेक दशकांपासून NDTVचा अविभाज्य भाग बनले होते. NDTVमध्ये रविश कुमार अनेक कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करत होते. यांमध्ये आठवड्याचा शो हमलोग, रविश की रिपोर्ट, देश की बात आणि प्राईम टाईम या कार्यक्रमांचा समावेश होता. त्यांना दोनदा रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम अवॉर्ड आणि 2019 मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.