‘स्वत:च विद्रुपीकरण करण्यातच धन्यता मानणारा भाजप शहरातील विद्रुपीकरण कसे रोखणार’

bjp

पुणे : पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी व राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले. हे उद्घाटन मात्र आता वादात साफ्डले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपने महानगरपालिका परिसरात, महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर, महानगरपालिका इमारतीच्या चारही बाजूला होर्डिंग्स लावून या परिसराचे विद्रुपीकरण केल्याचा आरोप करत जोरदार निशाणा साधलाय.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपने जे नियम पायदळी तुडवले आहेत, पुणेकरांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे, त्याकडे अजिबात दुर्लक्ष करता येणार नाही. याचे उत्तर भाजपने पुणेकरांना देण्याची गरज असल्याचा घणाघात प्रशांत जगताप यांनी केलाय.

पुणे महानगरपालिका परिसरात भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्याबद्दल आम्ही भाजपचे अभिनंदन करतो व शुभेच्छा देतो. परंतु, या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपने महानगरपालिका परिसरात, महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर, महानगरपालिका इमारतीच्या चारही बाजूला होर्डिंग्स लावून या परिसराचे विद्रुपीकरण करण्याचे काम केले आहे. असं प्रशांत जगताप म्हणाले आहेत.

तर, ज्या महानगरपालिकेत सत्तेत आहोत, त्या परिसरातील विद्रुपीकरण रोखणे तर दूरच उलट स्वत:च विद्रुपीकरण करण्यातच धन्यता मानणारा भाजप शहरातील विद्रुपीकरण कसे रोखणार, हा खरा पुणेकरांचा प्रश्न आहे. तसेच, भाजपकडून आपल्या परिसराचे विद्रुपीकरण केले जात असताना महानगरपालिका आयुक्त व प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असतील, तर यावरून महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपची दादागिरी आपल्या सहज लक्षात आल्याशिवाय राहत नाही. याबाबत ‘पार्टी विथ डिफरन्स’चा नारा देणाऱ्या भाजपने थोडे अंतरंगात डोकावून पाहण्याची गरज आहे. असा जोरदार टोला जगताप यांनी लगावला आहे.

तसेच, देशातील विविध राज्यांत कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने प्रवेश केला आहे. त्यामुळे देशात आणि राज्यात या नव्या व्हेरिएंटची धास्ती आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार हा व्हेरिएंट राज्यात प्रवेश करू नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी काही निर्बंध घातले जात आहेत. मात्र, अशा परिस्थितीत भाजपने हा कार्यक्रम घेत एकप्रकारे पुणेकरांचे आरोग्य धोक्यात घालण्याचाच प्रयत्न केला आहे. किंबहुना हा नवा व्हेरिएंट पुण्यात प्रवेश करणार नाही, याचे स्वप्न भाजप नेत्यांना पडले असावे, त्यामुळेच त्यांची वर्तणूक अशी बेफिकीरीची दिसून येत आहे. आधीच पुणेकरांना कोरोनामुळे अनेक संकटांचा सामना करावा लागला असताना भाजप नेत्यांनी आपण या संकटात भर का टाकत आहोत, याचा विचार करण्याची गरज आहे. ईश्वर भाजप नेत्यांना असा विचार करण्याची सद्बुद्धी देवो, एवढीच प्रार्थना. अस म्हणत प्रशांत जगताप यांनी भाजप नेत्यांना फैलावर घेतले आहे.

हे देखील पहा 

https://www.youtube.com/watch?v=FkhUTw1OjTM

Previous Post
मंत्रा प्रॉपर्टीजचा व्यावसायिक रिअल इस्टेटमध्ये प्रवेश

मंत्रा प्रॉपर्टीजचा व्यावसायिक रिअल इस्टेटमध्ये प्रवेश

Next Post
उर्फी जावेदने शेअर केलेल्या 'त्या' फोटोमुळे ऐन थंडीत झाले वातावरण गरम

उर्फी जावेदने शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोमुळे ऐन थंडीत झाले वातावरण गरम

Related Posts
farm

बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना नक्की काय, किती मिळते अनुदान ? शेतकरी मित्रांनो नक्की वाचा !

मुंबई : राज्यातील अनुसुचित जमाती प्रवर्गातील शेतक-यांना सिंचनाची शाश्वत सुविधा निर्माण करणे. या उद्देशासाठी राज्यात बिरसा मुंडा कृषि…
Read More
Bhausaheb Rangari Ganapati | ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’तर्फे वारकरी सेवा, पुरवली भोजनाची व्यवस्था

Bhausaheb Rangari Ganapati | ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’तर्फे वारकरी सेवा, पुरवली भोजनाची व्यवस्था

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव अशी ओळख असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या (Bhausaheb Rangari Ganapati) माध्यमातून पुण्यात मुक्कामी…
Read More