अमरावतीत महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण तापलं; आयुक्त आष्टीकरांच्या अंगावर महिलांनी फेकली शाई

अमरावती : शहरातील राजापेठ चौकातील रेल्वे उड्डाणपुलावरजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रशासनाने हटवल्यामुळे तेथील महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आमदार रवी राणा यांच्या महिला समर्थकांनी महानगरपालिकेचे आयुक्त आष्टीकर यांच्या अंगावर शाईफेक केली आहे. त्यामुळे पालिका प्रशासन या महिलांनावर काय कारवाई करणार, याकडे सगळ्याचं लक्ष लागून आहे. तर तिकडे रवी राणी यांनी महापालिकेसमोरच आंदोलन सुरू केले आहे.

११ जानेवारी रोजी आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी शहरातील राजापेठ चौकातील रेल्वे उड्डाणपुलावर मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला. त्याच्या दुसऱ्या दिवशी आमदार रवी राणा यांनी त्या पुतळ्याचे अनावर देखील केले. महाराजांचा पुतळा अनधिकृतपणे उभारण्यात आल्याचं पालिकेच्या लक्षात आलं. त्यानंतर तो पुतळा महानगरपालिकेकडून हटवण्यात आला.

रवी राणा यांनी महापालिका आयुक्तांकडे १३ जानेवारीला एक निवेदन सादर केले. महापौर आणि आयुक्तांनी यासंदर्भात पुढाकार घेऊन पुतळ्याला प्रशासकीय परवानगी तसेच मान्यता द्यावी. अशा पद्धतीची मागणी रवी राणा यांनी केली होती. त्याचवेळी महापालिकेत एक बैठकही त्यांनी घेतली. आपले महापौरांसोबत बोलणे झाले आहे, पुतळय़ाच्या परवानगीचे सोपस्कार विशेष सर्वसाधारण सभा बोलावून पूर्ण करून घ्यावेत, असे निर्देशही त्यांनी दिले. मात्र त्यानंतरही पालिकेने पुतळा हटवल्यामुळे तेथे नवीन वाद निर्माण झाला.